Sangli receives 700 tons of new currants a day
Sangli receives 700 tons of new currants a day 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत नविन बेदाण्याची दिवसात 700 टन आवक 

घनशाम नवाथे

सांगली  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा डिसेंबरलाच नविन बेदाण्याची आवक झाली. आजच्या सौद्यात विनायक हिंगमिरे यांच्या गणेश ट्रेडिंग दुकानात राजेंद्र सदाशिव उमरे (कुमठे) यांच्या 23 बॉक्‍स बेदाण्याला 161 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळाला. आजच्या सौद्यात 32 दुकानात तब्बल सातशे टन बेदाण्याची आवक झाली होती. 

यंदा नविन बेदाणा आवक फेब्रुवारी-मार्चमध्ये येईल म्हणून दर दिवाळीनंतर सुरू असलेल्या सौद्यात बेदाण्याचे दर वाढले होते. तसेच आवक देखील विक्रमी होती. परंतू आजच्या सौद्यात कुमठे येथील सदाशिव उमरे यांनी गणेश ट्रेडिंग या दुकानात 30 बॉक्‍स नवीन बेदाणा आणला. नविन बेदाण्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांच्यात उत्साह दिसला. त्यांचा 23 बॉक्‍स साधारण लांब बेदाणा राजयोग ओहर्सेसचे योगेश कबाडे यांनी 161 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केला. त्याच दुकानात 220 रुपये इतका उच्चांकी दरानेही बेदाणा सौदा झाला. तर अन्य दुकानात आज 236 रूपये प्रति किलो असा जुन्या बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला. 

दरम्यान, आज गणेश ट्रेडिंग या दुकानात नवीन सौद्यास बेदाणा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष मनोज मालू, अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते प्रारंभ झाला. पप्पू मजलेकर, कुमार दरूरे, गुलशन अग्रवाल, विनायक हिंगमिरे, आप्पासो आरवाडे, निर्मल रुणवाल, रविकुमार हजारे, योगेश कबाडे, नितीन मर्दा, हिरेन पटेल, सचिन चौगुले, परेश मालू, पवन चौगुले, विनोद कबाडे, दिगंबर यादव, अभिजित पाटील, अरुण शेडबाळे, रुपेश पारेख, मनीष मालू, हरीश पाटील, नितीन अटल, आरिफ कच्छी, सोमनाथ मनोळी, कांतीभाई पटेल उपस्थित होते. 

बेदाणा दर असा 
सध्या काळा बेदाणा 30 ते 60 रुपये किलो, साधारण लांब बेदाणा 80 ते 150 रुपये किलो, गोल ऍव्हरेज बेदाणा 100 ते 150 रूपये, उत्कृष्ट व उच्च प्रतीचा गोल बेदाणा 160 ते 250 रुपये किलो दराने भाव मिळत आहे. सांगलीतील सौद्यात बेदाण्यास चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT