The Sangli-Satara inter-district border has been sealed 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली-सातारा आंतरजिल्हा या सीमा झाल्या सील

सकाळवृत्तसेवा

कडेगाव : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करताच कडेगाव पोलिसांनी सांगली-सातारा आंतर जिल्हा मार्ग शंभर टक्के बंद केले.

कोरोनाचा सांगली, सातारा जिल्ह्यात धोका वाढत असून कडेगाव पासून सुमारे दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर कऱ्हाड तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर कडेगाव तालुक्‍यातील लोकांचा कऱ्हाड शहराशी सतत संपर्क असतो. त्यामुळे कडेगाव तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. 

त्याचबरोबर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे अनेक कोरोनाचे रुग्ण दाखल झाले आहेत; तर कृष्णा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या येतगाव (ता. कडेगाव) येथील एका व्यक्तीस कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकजण कऱ्हाड तालुक्‍यात नोकरी निमित्ताने जात आहेत. यातील बहुतांश वेगवेगळ्या दवाखान्यात काम करीत आहेत. यामुळे कडेगाव पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा आदेशाचे पालन करीत तालुका कोरोना मुक्त रहावा यासाठी सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या असून येथील चेक पोस्टवर पोलिस बंदोबस्तही वाढवला आहे. 

यापूर्वीही आंतर जिल्हा सीमा पोलिसांनी बंद केल्या आहेतच, परंतु शामगाव खिंडीतून मोठ्या प्रमाणात लोक कडेगाव तालुक्‍यात येत होते. त्यामुळे बोंबाळेवाडी व करांडेवाडी येथून कऱ्हाड तालुक्‍यातून जाणारे सर्व रस्ते जेसीबी मशिनद्वारे चर काढून पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. येतगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. तालुक्‍यातील सोनसळ खिंड, रायगाव फाटा व खंबाळे औंध येथील आंतर जिल्हा चेकपोस्टवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व आंतरजिल्हा मार्ग रोखले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT