Sangali Schools Closed Due To Rain Esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Schools Closed: सांगलीत शाळांना सुट्टी जाहीर; खबरदारी म्हणून सैन्याच्या जवणांना केलं पाचारण

Sangali Flood: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळी या परिसरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे या परिसरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशात सांगली जिल्ह्यात अनेक भागात पूर येण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम शालेय वि‌द्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह वाळवा,पलूस व शिराळा तालुक्‍यातील सर्व विद्यार्थ्यांना 27 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान सांगली जिल्ह्यातील अनेक भागांतील पूर परिस्थिती सध्या आटोक्यात असली तरी पुढील काही दिवसात पूरस्थितीचे संकट उद्भभवल्यास याचा मुकाबला करता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून भारतीय सैन्याची एक तुकडी आज जिल्ह्यात दाखल झाली आहे. यामध्ये सुमारे 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

कृष्णा-कोयना, वारणा नद्यांच्या परिसरात पर्जन्यवृष्टी, धरण पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यासह धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढत्या पावसामुळे कृष्णेच्या पाणीपातळीत झपाटयाने वाढ झाली असून, यात अजूनही भर पडत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून औदुंबर परिसरात नदीच्या काठालगत राहणाऱ्या नागरिकांच्यासाठी आमदार विश्वजीत कदम यांनी 6 यांत्रिक बोटी उपलब्ध करून दिल्या आहेत.

या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली जात असून, यासाठी 15 जणांना बोटी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

West Bengal Politics: ‘तृणमूल’कडून झालेला छळ विसरलो नाही; सुवेंदू अधिकारी यांचा इशारा, राजकीय गुन्ह्यांची चौकशी होणार!

'मुलांना जन्माला घालण्यापेक्षा कुत्रा पाळा' शेफाली शाहचा सल्ला, तरुण पिढीला दिला 'हा' सल्ला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

SCROLL FOR NEXT