पश्चिम महाराष्ट्र

सांगली : भाजपची घमेंड उतरवू; युती तोडण्याचा शिवसैनिकांचा इशारा   

सकाळ वृत्तसेवा

सांगली -  विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या उद्‌घाटन समारंभास भाजपने शिवसेनेला बोलावले नाही. त्यांना सत्तेची घमेंड आहे. ती आम्ही उतरवून दाखवू. सांगलीत कोणत्याही स्थितीत भाजप - शिवसेनेची युती होऊ नये, अशी मागणी शिवसेनेकडे करू, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि शहर प्रमुख मयूर घोडके यांनी आज दिला. 

ते म्हणाले,""विश्रामबाग उड्डाण पुलाचे काम युती सरकारच्या काळात मंजूर झाले. युती म्हणजे केवळ भाजप नव्हे. त्यात शिवसेना, रासप, रिपाई सारे पक्ष आहेत. भाजपने यापैकी कुणाला उद्‌घाटनाला बोलावले, ते सांगावे. आम्हाला बोलावण्यात त्यांना कमीपणा वाटतो काय? लोकसभा निवडणूक आली की मते मागायला येता. प्रचार करायला आम्ही चालतो. आम्ही जीवाचे रान करतो. अशा कार्यक्रमात मात्र आम्ही चालत नाही. भाजपला घमेंड आली आहे. ती आम्ही उतरवून दाखवतो. आम्ही सरकारचा घटक आहोत आणि सरकारी कामाला पक्षाचा मेळावा केला जात आहे. हा अहंकार आहे. शिवसेनेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सामान्य कार्यकर्ता नाराज आहे. त्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल.'' 

ते म्हणाले,""हे पहिल्यांदा घडलेले नाही. सतत शिवसेनेकडे कानाडोळा केला जातो, कमी लेखण्याचा प्रयत्न होत असतो. याबाबत आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहोत. राज्याचे माहिती नाही, मात्र सांगलीत युती करू नका, अशीच आमची विनंती असेल. हे हवेत आहेत, त्यांना जमिनीवर आणण्याचे काम यावेळी नक्की होईल.''  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT