Crime news esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : हिंदू-मुस्लिम द्वेषभावना भडकवणारे भाषण! विक्रम पावसकर यांच्यावर इस्लामपुरात गुन्हा!

सकाळ डिजिटल टीम

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मामध्ये जातीय तेढ व द्वेषाची भावना निर्माण करणारे भाषण केल्याप्रकरणी कराड येथील विक्रम पावसकर यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अमर शिवाजी जंगम यांनी फिर्याद दिली आहे.

२ जूनला येथील तहसील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पावसकर यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात गंभीर विधान केले होते. त्या अनुषंगाने येथील मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी व पुरोगामी विचारांच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पावसकर याच्यावर इस्लामपूर पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, २ जूनला रात्री पावणे आठ वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान इस्लामपूर यांनी कचेरी चौकात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुस्लिम समाजाला उद्देशून पावसकर याने अवमानकारक शब्द दोन वेळा वापरला.

'मुस्लिम समाजावर बहिष्कार टाकला पाहिजे, बहिष्कार म्हणजे ज्याच्या कपाळी टिळा त्याच्याशी व्यवहार आणि ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याशी व्यवहार टाळा' अशा पद्धतीचे वक्तव्य करून हिंदू-मुस्लिम धर्मात जातीय तेढ व द्वेषाची भावना निर्माण होण्यासारखे भाषण केले. तसेच मुस्लिम समाजाला उद्देशून अपमानास्पद वक्तव्य केले असल्याचे जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पावसकर याच्यावर भारतीय दंड विधान संविधान कलम १५३ अ, २९५ अ आणि २९८ प्रमाणे काल (ता. २१) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इस्लामपूर शहरातील संभाजी ब्रिगेड, आरपीआय, मुस्लिम लीग तसेच काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात पावसकर याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मागणी केली होती. कॉम्रेड दिग्विजय पाटील, सुधीर कांबळे, ऍड. जमीर खानजादे व शाकीर तांबोळी यांनी पोलिसांना निवेदन दिले होते; परंतु पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने या कार्यकर्त्यांनी त्यांना जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला असल्याचे समजते.

"विक्रम पावसकर याच्यावर यापूर्वीही विटा शहरात जातीय विद्वेषक भाषण केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे; परंतु पोलीस प्रशासनाने अटकेची कारवाई न केल्याने पावसकर हा सतत भडकाऊ भाषणे करत आहे.

इस्लामपूरमधील कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलीस प्रशासन वाचवण्याचं काम करत आहे. संबंधित आयोजकांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील."

- शाकीर तांबोळी, काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, प्रदेश उपाध्यक्ष, इस्लामपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT