Vilas jagtap sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : भाजपमध्ये फूट, विलासराव जगताप बाहेर

भाजप पॅनेलमध्ये खळबळ : खासदारांनी उमेदवार परस्पर बदलल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलमधील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या पॅनेलमध्ये अचानक खळबळ उडाली.

जागावाटपावरून खासदार संजय पाटील आणि जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात मोठा वाद निर्माण झाला.

जत सोसायटी गटातील उमेदवाराचे नाव परस्पर बदलल्याने संतप्त झालेल्या जगताप यांनी नाराजी व्यक्त करीत भाजप पॅनेलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दुसरीकडे, काँग्रेसमध्येही मिरज तालुक्यातील उमेदवार बदलल्याने नाराजीचा सूर उमटला. दोन्ही पॅनेलमध्ये नाराजी निर्माण झाल्याने तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान होत आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीचे वसंतदादा पाटील शेतकरी विकास पॅनेल, विरोधी भाजपचे शेतकरी परिवर्तन पॅनेल, तर तिसरी आघाडी अशी निवडणूक होत आहे.

खरी लढत महाविकास आघाडी व भाजपमध्ये होईल. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या आज जाहीर करण्यात आल्या. यात जत तालुक्यातून भाजप पॅनेलचे नेते खासदार पाटील व जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी काँग्रेस व ‘राष्ट्रवादी’ला जबर धक्का दिला. या दोन्ही पक्षांच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडी आणि भाजप पॅनेलच्या उमेदवारांची नावे आज प्रसिद्ध करण्यात आली. यादीनंतर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी,

सोसायटी गटातून भाजप जत अध्यक्ष प्रमोद सावंत यांचे नाव खासदार पाटील आणि प्रकाश जमदाडे यांच्या गटाने परस्पर बदलून त्याठिकाणी बिळूर गटातील चिदानंद चौगुले यांना उमेदवारी दिली. यादीत बदल केल्याची माहिती समजताच जगताप यांनी संताप व्यक्त करीत भाजप पॅनेलमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT