sangli theft 
पश्चिम महाराष्ट्र

अबब...सांगलीतून 70 तोळे सोने पळविले 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः टिळक चौकातील सराफी पेढीतून 70 तोळ्याच्या सोन्याच्या पट्ट्या लंपास करण्यात आल्या. दुकानातील कामगाराने सराफाचा विश्‍वास संपादन करून सुमारे 21 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश निवृत्ती म्हस्के, संजय म्हस्के आणि अनोळखी अशी त्यांची नावे आहेत. सराफ हणमंत वसंत गायकवाड (रा. बुधगाव) यांनी फिर्याद दिली. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की हणमंत गायकवाड हे बुधगावमधील वसंतदादा कॉलेजवळ राहतात. टिळक चौकातील आयकॉन कॉम्प्लेक्‍स्‌मध्ये गाळा क्रमांक 7 मध्ये त्यांची पेढी आहे. त्याठिकाणी सोने खरेदी-विक्रीसह रिफायनरी केली जाते. गेल्या काही वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय आहे. त्याठिकाणी संशयित दोघे कामाला होते. त्यांनी गायकवाड यांचा विश्‍वास संपादन केला होता.

मंगळवारी (ता.18) रोजी सकाळी अकराच्या सुमारास संशयित सुरेश म्हस्के, संजय म्हस्के आणि अनोळखी यांनी तिजोरीतील 70 तोळे वजनाच्या सोन्याच्या पट्ट्या लंपास केल्या. चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हणमंत गायकवाड यांनी विचारणा केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT