sangli water
sangli water 
पश्चिम महाराष्ट्र

सावधान...सांगलीतील पाणी पिऊ नका 

सकाळवृत्तसेवा

सांगली : शहरात नळाद्वारे पुरवण्यात येणारे पाणी दूषित आणि गढूळ असल्याने पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल खासगी प्रयोगशाळेने दिला आहे. या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाची चौकशी करुन शहराला तातडीने स्वच्छ पाणी पुरवण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी केली. 


साखळकर म्हणाले,""सांगलीतील खणभाग आणि विश्रामबाग येथील नळ कनेक्‍शनद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले होते. त्यांची येथील निखिल लॅबोरेटरीमधून तपासणी करून घेतली. त्यामध्ये हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे. पिण्यास योग्य पाण्यात इकोलीचे प्रमाण शून्य लागते मात्र महापालिकेने पुरवठा केलेल्या पाण्यात हे प्रमाण दोन इतके आहे. तर एमपीएनचे प्रमाणही शून्य असावे लागते ते सहा इतके जास्त आहे. पाण्याची गढूळता तर 16.8 इतकी मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शहरातील पाणी पिण्यास योग्य नाही.'' 

ते म्हणाले,""हे पाणी न उकळता पिल्यास नागरिकांना टाईफाईड, कॉलरा, जुलाब, कावीळ, पोटाचे विकार असे आजार होऊ शकतात. त्यामुळे शहरात नळाद्वारे पुरवण्यात येणारे पाणी पिण्यास योग्य नाही. एकीकडे महापालिका शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागावर कोट्यवधी रुपये खर्च करते. पाणी शुध्द करण्यासाठी तुरटी व पावडर मिसळली जाते. तरीही पाणी अशुध्द आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाची चौकशी करणे आवश्‍यक आहे. पाणीपुरवठा विभागाने शहराला तातडीने शुध्द पाणीपुरवठा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उत्तम साखळकर यांनी दिला आहे. हा अहवाल आयुक्तांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.'' 

आंदोलनाचा इशारा 
शेरीनाला फुटून त्याचे पाणी कृष्णा नदीत मिसळतच आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण सुरू आहे. शहरात पिण्याच्या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरत असल्याचा आरोप सतीश साखळकर यांनी केला आहे. शेरीनाल्याचा बंदोबस्त करावा, अशी प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तात्पुरती मलमपट्टी करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. एकीकडे स्वछ सर्वेक्षण 2020 साठी शहरात स्वच्छता सुरू आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे ते पार पाडले पाहिजे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सतीश साखळकर यांनी दिला.  

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT