sangli weekend lockdown response is good covid 19 update marathi news
sangli weekend lockdown response is good covid 19 update marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

Weekend Lockdown: सांगलीत शुकशुकाट ; सांगलीकरांनी  दिला उत्स्फुर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सरकारने लागू केलेल्या दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनला आज सांगली शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली. सकाळच्या सत्रात तुरळक गर्दी दिसून आली. मात्र दुपारनंतर शुकशुकाट होता. येथील मुख्य बाजारपेठाही बंद होत्या. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. महापालिका क्षेत्रातही रुग्णसंख्या वाढती आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सरकारने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला सांगलीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. सकाळी तुरळक गर्दी शहरात दिसून आली. त्यानंतर मात्र रस्ते ओस पडले होते. मेडिकल, दुध, भाजीपालासह अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शहरातील शिवाजी मंडई, मारूती चौक, हरभट रोड, गणपती पेठ, पटेल चौक, कॉलेज कॉर्नर, विश्रामबाग चौक, गणपती मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आला.

शहरातील मुख्य चौकांसह विविध ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मज्जाव केला जात असल्याचे दिसून आले. शहरी बससेवाही बंद ठेवण्यात आली होती. सांगली डेपोमधील कोल्हापूर, इचलकरंजी वगळा सर्व बस सेवा बंद करण्यात आली होती. केवळ दहा टक्के बससेवा सुरू असल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

शहरात दुपारी सर्वच रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून आले. नागरिकांनीही स्वतःहुन घराबाहेर जाणे टाळले. अत्यावश्‍यक सेवा वगळता विकेंड लॉकडाउनला सांगलीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र आज दिवसभर दिसून आले.

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT