Wrestling Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Wrestler : तीन दशकांत एक ‘हिंदकेसरी’, तर दोन ‘महाराष्ट्र केसरी’ घडले; प्रतीक्षा बागडीच्या यशाने ‘चार चाँद’

एकेकाळी कुस्तीपंढरी गणल्या गेलेल्या सांगलीची कुस्ती प्रशिक्षण क्षेत्रात खासियत. इथल्या तालमींनी राज्यासह देशात लौकिक मिळवलेले मल्ल दिले.

अजित कुलकर्णी

एकेकाळी कुस्तीपंढरी गणल्या गेलेल्या सांगलीची कुस्ती प्रशिक्षण क्षेत्रात खासियत. इथल्या तालमींनी राज्यासह देशात लौकिक मिळवलेले मल्ल दिले.

सांगली - एकेकाळी कुस्तीपंढरी गणल्या गेलेल्या सांगलीची कुस्ती प्रशिक्षण क्षेत्रात खासियत. इथल्या तालमींनी राज्यासह देशात लौकिक मिळवलेले मल्ल दिले. पैलवानांची शक्ती, बुद्धिक्षमतेचा इथल्या मातीत कस लागतो, हे पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरलेल्या प्रतीक्षा बागडीच्या यशावरून सिद्ध झाले. प्रतीक्षाच्या यशानंतर ती सराव करत असलेले वसंतदादा कुस्ती केंद्र पुन्हा ‘फिनिक्स’भरारी घेत आहे. या केंद्राची ती दुसरी ‘महाराष्ट्र केसरी’ ठरली आहे.

पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या खेळात काही वर्षांत महिला कुस्तीपटूंचा टक्का वाढला आहे. सांगलीत ‘वज्रदेही’ हरी नाना पवार यांची आद्य बजरंग व्यायामशाळा, ‘मल्लसम्राट’ विष्णुपंत सावर्डेकर यांची भोसले व्यायामशाळा, हांडे-पाटील तालीम, सरकारी तालीम व वसंतदादा कुस्ती केंद्र या प्रशिक्षणासाठी नामवंत तालमी आहेत.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने कुस्तीसाठी आयुष्य वाहिलेले राम नलवडे (मामा) यांनी ही तालीम सुरू केली. १९८९ पासून यशवंतनगर येथे सुरू असलेल्या केंद्रातून तंत्रशुद्ध कुस्तीचा परिपाठ सुरू झाला. २००२ मध्ये केंद्रातील मुन्नालाल शेख या त्यांच्या शिष्याने ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा मिळवली. योगेश दोडके याने हिंदकेसरी किताबाला गवसणी घालत केंद्राचा लौकिक वाढवला. डी. एस. सूर्यवंशी, सी. बी. चव्हाण यांनी मल्लविद्या शिकवली.

तेव्हापासून आजअखेर शेकडो राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नामवंत मल्ल या मातीत घडले. प्रतीक्षाच्या रुपाने पहिला किताब या तालमीला मिळाला. सुनील चंदनशिवे हे सध्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत. पाच वर्षांत महिला कुस्तीला ग्लॅमर आल्याने केंद्राने खास प्रशिक्षणाची व्यवस्था केली. सध्या १५ महिलांसह मॅट व लाल मातीवर १५० कुस्तीपटू ही कला आत्मसात करत आहेत. प्रतीक्षासह अन्य चौघींनी महाराष्ट्र केसरी कुस्तीत वजनी गटात दिमाखदार यश मिळवल्याने कौतुक होत आहे.

पहिला मॅट...पहिली गदा

आयुष्यातील आठ दशके कुस्तीसाठी व्यतीत केलेल्या राम नलवडे यांनी लाल मातीच्या कुस्तीसमवेतच दूरदृष्टीने सरावासाठी मॅट आणले. पश्चिम महाराष्ट्रात तो पहिलाच मॅट असल्याने बरीच टीका-टिपण्णी झाली. कालांतराने आंतरराष्ट्रीय पातळीवरची कुस्ती मॅटवरच आल्याने त्यांच्या दूरदृष्टीची प्रचीती आली. अनेकजणांना कुस्ती क्षेत्रातील कामगिरीवर आयुष्याची भाकरी मिळाली. आता प्रतीक्षा बागडीने मॅटवरच कुस्ती निकाली करून पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवत कुस्ती केंद्राची कीर्ती दिगंत केलीय.

तंत्रशुद्ध प्रशिक्षणासमवेतच नीतिमूल्यांची शिकवण या मातीत मिळत असल्याने राज्यासह परराज्यातील मल्ल येथे कुस्तीचे धडे गिरवण्यास येतात. प्रतीक्षाच्या यशामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्राने वेधलेय. स्व. राम नलवडे पैलवान ट्रस्टमार्फत आणखी अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करू. ऑलिंपिक गाजवणारा पैलवान तयार करण्याचे ध्येय आहे.

- पै. राहुल नलवडे, विश्वस्त, वसंतदादा कुस्ती केंद्र, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT