Sangli ZP acting ceo Chandrakant Gudewar ordered to close accounts of Bank of India 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्हा परिषदेने बँक ऑफ इंडियाला दिला हा दणका

सकाळवृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषदेशी निगडीत सर्व विभागांची बॅंक ऑफ इंडिया या अग्रणी बॅंकेतील सर्व बचत खाती बंद करावीत. अन्य राष्ट्रीयकृत बॅंकांत खाती वर्ग करावीत, असे आदेश जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी आज दिले. या सर्व बचत खात्यांवरील रकमांना एक रुपयाचेही व्याज बॅंकेकडून दिले जात नव्हते. त्याबाबत वारंवार विनंती, सूचना, बैठका घेऊनही दाद दिली जात नसल्याने हा दणका देण्यात आला. श्री. गुडेवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा हा सर्वात मोठा दणका मानला जात आहे. 

ग्रामपंचायतींकडे चौदाव्या वित्त आयोगामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तो अग्रणी बॅंक म्हणून बॅंक ऑफ इंडियामध्ये ठेवावे, असे आदेश देण्यात आले होते. शिवाय जिल्हा परिषदेकडील बहुतांश विभागांची बचत खाती याच बॅंकेकडे आहेत. या रकमेवर व्याज दिले जात नव्हते. त्याबाबत बहुतांश ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती.

त्यानंतर तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी भेट घेतली. बॅंकेच्या वरिष्ठांशी चर्चा झाली. त्यांनी व्याज देण्याची व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतरही हालचाल झाली नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी बिनव्याजी बॅंकेत राहिल्याने नुकसान होत राहिले. त्यामुळे या बॅंकेतील खाती काढून घ्यावीत आणि ती अन्य राष्ट्रीयकृत बॅंकेत वर्ग करावीत, असा प्रस्ताव चर्चेत होता. त्यावर श्री. गुडेवार यांनी आज सह्या करत बॅंक ऑफ इंडियाला मोठा झटका दिला. 

सध्या बॅंक इंडियाच्या पटेल चौकातील शाखेत अकरा खाती आहेत. त्यात खासदार वंदना चव्हाण, जावेद अख्तर, त्रिपाठी, मेनन यांचा निधी, सुब्रम्हण्यम यांचा निधी, मंत्री रामदास आठवले यांचा निधी, 13 व्या वित्त आयोगातील नाविन्यपूर्णचा निधी, लोकप्रतिनिधींनी सूचवलेल्या कामांचे खाते, महाऑनलाईनचे खाते, वेतन कपात खाते यांचा समावेश आहे. दिव्यांग कल्याण निधीचे खाते विश्रामबाग शाखेत आहे. याशिवाय, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरील खातीही बंद करावीत, असे श्री. गुडेवार यांनी आदेशात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT