Sangli's wrestler finalized for Maharashtra Kesari 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीचे पैलवान ठरले... 

अनिलदत्त डोंगरे

सांगली : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्हा निवड चाचणी स्पर्धा नुकतीच झाली. 26 व 27 फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हा तालीम संघाच्या विद्यमाने शांतीनिकेतन (सांगली) येथे झालेल्या सांगली जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे उद्‌घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहीते यांच्या हस्ते झाले. 

तालीम संघाचे उपाध्यक्ष संपतराव जाधव, विलास शिंदे, तालीम संघाचे चिटणीस प्रतापराव शिंदे, संचालक शिवाजी जाधव, राजेंद्र शिंदे, सुनिल मोहिते, मोहन बडरे यांच्यासह राष्ट्रीय पंच हणमंतराव जाधव उपस्थित होते. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी गादी विभागातूनजिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे मल्ल असे : 57 किलो- निनाद बडरे (आटपाडी), 61 किलो- तेजस पाटील (सूरुल), 65 किलो- नाथा पवार (बेणापूर), 70 किलो- अनिकेत पाटील (बेणापूर), 74 किलो- वैभव शिंदे (बेणापुर), 79 किलो- सागर पवार (पेठ), 86 किलो- अमर पाटील (बिळाशी), 92  किलो- सागर तामखडे (भिकवडी), 97 किलो- सुबोध पाटील (सांगली). महाराष्ट्र केसरी गट अक्षय कदम (बेनापूर) 

माती विभाग : 57 किलो- रोहीत तामखडे (भिकवडी), 61 किलो- राहुल पाटील (सुरुल), 65 किलो- इंद्रजित शिंदे (बेणापूर), 70 किलो- मयुर जाधव (चिंचोली), 74 किलो- श्रीकांत निकम (देविखिंडी), 79 किलो- प्रथमेश गुरव (शिराळा), 86 किलो- खशाबा मदने (बेणापूर), 92 किलो- पृथ्वीराज पवार (सांगली), 97 किलो- विनय पाटील (नागठाणे). महाराष्ट्र केसरी गट - सुरज निकम (नागेवाडी)

शांतीनिकेतनचे संचालक गौतम पाटील यांचे स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. जिल्ह्यातील जुन्या काळातील पैलवान उपमहाराष्ट्र केसरी बाळू मुल्ला यांची शारीरिक स्थिती ठीक नसल्यामुळे व परिस्थिती बेताची असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा तालीम संघाच्यावतीने मदत म्हणून 21 हजार रुपये आर्थिक मदत देत सत्कार व सन्मान करण्यात आला.

विनायक पाटील, नामदेव बडरे, युवराज पाटील, शंकर पाटील, रविंद्र पाटील, धनंजय महाडीक, सुहास पाटील, सुनिल चंदनशिवे, शामराव मासाळ, दिपक पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. ज्योतिराम वाझे, कृष्णा शेंडगे यांनी निवेदन केले. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mumbai: रुग्णाला रक्ताची गरज, बेड नाही म्हणत उपचार नाकारले; मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

SCROLL FOR NEXT