SANJAYKAKA 
पश्चिम महाराष्ट्र

संजयकाका पुन्हा म्हणाले, ""अरे, मी भाजपचाच'' 

अजित झळके

सांगली ः खासदार संजयकाका पाटील यांचं नेमकं चाललंय काय, हा प्रश्‍न सतत चर्चेत असतो. तो कॉंग्रेसमध्ये चर्चिला जातो, तो राष्ट्रवादीत असतो आणि हल्ली भाजपमध्ये तर फारच असतो. या चर्चेवर पुन्हा एकदा त्यांनी विराम लावला आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा प्रचारासाठीच्या मेळाव्यात त्यांनी ""अरे, मी कुठेही गेलेलो नाही, मी भाजपचाच आहे, इथेच आहे, कुणी गैरसमज पसरवू नये'', असे स्पष्ट केले आहे. 


खरे क्‍लब हाऊसमध्ये देशमुख यांचा प्रचारासाठी मेळावा झाला. त्याला माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. या मेळाव्याला खासदार संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी या व्यासपीठावरून "मी इथेच आहे', हे सांगण्याला वेगळे महत्व आहे. कारण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी संजयकाकांनी दौऱ्याकडे पाठ फिरवली, कारण त्या दौऱ्याचे नियोजन आमदार गोपीचंद पडळकर करत होते. तेंव्हापासून संजयकाका कुठे आहेत, ते राष्ट्रवादीशी अंडरस्टॅंडिंगने खेळताहेत का, अशा चर्चा रंगल्या होत्या. भाजपच्या प्रमुख कार्यक्रमांतील त्यांची गैरहजेरी चर्चेत येत होती. आज मात्र ते हजर राहिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT