sanjay raut is on belgaum tour for election wednesday in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

संजय राऊत यांचा बुधवारी बेळगाव दौरा

मिलिंद देसाई

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीतील महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी बुधवार (14) रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे बेळगावला येणार आहेत. खासदार राऊत यांनी स्वत: ट्वीटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. यावेळी पोट निवडणुकीसाठी समितीने शुभम शेळके या युवा कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असून शेळके यांना सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. समितीने प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेते मंडळीने बेळगावात यावे यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्याला प्रतिसाद देत शिवसेनेची मुलुख मैदान म्हणुन ओळख असणाऱ्या संजय राऊत यांनी बेळगाव येऊन प्रचार करण्याची माहिती दिली आहे. 

राऊत यांनी सीमावाशीयांवर होणाऱ्या अन्यायाबाबत नेहमीच आवाज उठविला असून सीमाप्रश्‍नाची सोडवणुक व्हावी यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळे राऊत बेळगावला येणार असल्याची माहिती मिळताच मराठी भाषिकांचा उत्साह वाढला आहे. त्यांच्या येण्याने समितीला बळ मिळेल असे मतही सीमावाशीयांमधून व्यक्‍त होत आहे.

राऊत यांची सभा व रोड शो आयोजित करण्यात येणार असुन राऊत स्वत : प्रचारात सहभागी होणार आहेत. सीमाप्रश्‍नाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ प्रसारीत करुन मराठी भाषिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शिंदे यांनी समितीच्या उमेदवाराला शिवसेनेचा पुर्ण पाठिंबा असून सीमाप्रश्‍नाचा समन्वयक मंत्री म्हणून आपण समितीला मतदान करण्याचे आवाहन करीत असल्याचे मत व्यक्‍त केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT