Sanjya Raut said Borderism is not a war of Kaurava-Pandava  
पश्चिम महाराष्ट्र

सीमावाद कौरव- पांडवाचे युद्ध नाही : संजय राऊत 

अशोक मुरुमकर

सोलापूर : आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. हे कौरव- पांडवांच युद्ध नाही. ही जमिनीची नाही, संस्कृतीची लढाई आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावसंबंधी महाराष्ट्र-कर्नाटकातील संघर्षावर मुलाखतीत म्हटले आहे. 
बेळगाव येथील सार्वजिनक वाचनालयाच्या व्याख्यानमालेत खासदार राऊत यांची मुलाखत सुरु आहे. कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांच महाराष्ट्रातील साहित्यामध्ये योगदान आहे. गरीश कर्नाड, भीमसेन जोशी पंडित, रजनीकांत यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कॉंग्रसेचे मलिकार्जुन खरगे यांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. 
मुलाखीमध्ये विचारलेल्या प्रश्‍नावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचं नातं कसं होतं ते राऊत यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे माझ्यावर सुद्धा चिडायचे. ते बाळासाहेब होते त्यांना चिडण्याचा अधिकार होता असे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब माझ्यावर चिडले तरी, त्यांनी प्रेम सुद्धा माझ्यावर तितकचं केलं. बाळासाहेबांच्या प्रेमामुळे संजय राऊत आज देशाला दिसला. मी खूप चुका केल्या, पण बाळासाहेबांनी मला संभाळून घेतलं. माझ्या अनेक चुका बाळासाहेबांनी पोटात घातल्या असे संजय राऊत म्हणाले. सामनाचा संपादक झाल्यानंतर बाळासाहेब मला वेगवेगळया ठिकाणी घेऊन जायचे. तिथे माझी हा माझा फायर ब्राण्ड एडिटर अशी ओळख करुन द्यायचे, असेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले. आज राजकर्ते आपल्या मर्जीतील संपादक कसा येईल यासाठी लॉबी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. परिवर्तन करण्याची ताकदही वृत्तपत्रात असल्याचेही ते म्हणाले. 

खर्गेंबरोबर आम्ही शुद्ध मराठीतच बोलतो 
कॉंग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे प्रभारी आहेत. ते मूळचे कर्नाटकातील गुलबर्ग्याचे आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात खर्गे यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. आम्ही त्यांच्याबरोबर शुद्ध मराठीतच बोलतो असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT