Insurance Schemes esakal
पश्चिम महाराष्ट्र

Insurance Scheme : राज्यात 10 लाख ऊसतोड मजूर, दोन लाख बैलजोड्यांना संरक्षण; शासनाकडून अपघात विमा लागू

Insurance Schemes : ऊसतोड मजूर वेगवेगळ्या जिल्ह्यांत, तसेच शेजारील राज्यात कमीत कमी सहा महिने स्थलांतर करून उसतोडणीला जातात.

सकाळ डिजिटल टीम

ऊसतोडणी व वाहतुकीदरम्यान अनेक अपघात, विजेचा धक्का, सर्पदंश, वारा-पावसाने नुकसान, रस्ते अपघात यांसारख्या शेकडो समस्यांना तोंड देताना अनेकदा ऊसतोड मजुरांचा जीव जातो.

सांगली : राज्यातील १० लाख ऊसतोड मजूर, वाहतूकदार, मुकादम तसेच दीड ते दोन लाख बैलजोड्या, त्याचबरोबर ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांनाही विम्याचे कवच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना (Sant Bhagwan Baba Sugar Cane Workers Accident Insurance Scheme) नव्याने लागू करण्यात आली आहे. योजनेचा संपूर्ण खर्च ‘स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा’च्या भांडवलातून करण्यात येणार आहे. ऊसतोड मजूर, मुकादम, कारखाना यापैकी कुणावरही कसलाही आर्थिक भार राहणार नाही.

ऊसतोड मजूर वेगवेगळ्या जिल्ह्यांत, तसेच शेजारील राज्यात कमीत कमी सहा महिने स्थलांतर करून उसतोडणीला जातात. बीडसह सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आदी जिल्ह्यांतील दहा लाख ऊसतोड मजूर वेगवेगळ्या भागात ऊसतोडणी मजूर म्हणून काम करतात. ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र अत्यंत मेहनत व जोखमीचे काम करावे लागते.

ऊसतोडणी व वाहतुकीदरम्यान अनेक अपघात, विजेचा धक्का, सर्पदंश, वारा-पावसाने नुकसान, रस्ते अपघात यांसारख्या शेकडो समस्यांना तोंड देताना अनेकदा ऊसतोड मजुरांचा जीव जातो. अनेकजण अपंगत्व येऊन जायबंदी होतात. त्यांच्या कुटुंबीयांचा आधार नाहीसा होतो. या ऊसतोड मजुरांना, वाहतूकदारांना, तसेच त्यांच्या जनावरांना स्वतंत्र अपघात विमा योजना असावी, दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत व उपचार अशा तरतुदी असाव्यात.

मुला-मुलींना ८२ वसतिगृहे

महामंडळाच्या माध्यमातून राज्यात संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करून ऊसतोड मजुरांच्या मुला-मुलींसाठी ८२ वसतिगृहे सुरू करून ऊसतोड मजुरांच्या हातात वडिलोपार्जित कोयता न देता पाटी-पुस्तक देऊन शिक्षणाचा मार्ग खुला केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT