The sarpanch mane of Loni Venknath and member gade ineligible 
पश्चिम महाराष्ट्र

लोणी व्यंकनाथचे सरपंच माने, सदस्य गाडे अपात्र

संजय आ. काटे


श्रीगोंदे : लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच संतोष माने व ग्रामपंचायत सदस्य संदीप गाडे यांनी त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याप्रकरणी त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हा आदेश दिला. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काकडे यांनी या प्रकरणी दाद मागितली होती.


सरपंच माने व सदस्य गाडे हे दोघेही राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा यांच्या गटाचे आहेत. या निर्णयामुळे नहाटा यांना मोठा धक्का बसला आहे. काकडे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते, की सरपंच माने 28 मे 2018 रोजी लोणी व्यंकनाथचे सरपंच म्हणून जनतेतून निवडून आले होते.


सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राखीव जागेतून निवडून आल्यानंतर बारा महिन्यांत जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. तथापि, माने व गाडे या दोघांनीही अशी जातपडताळणी प्रमाणपत्रे वेळेत सादर केली नाहीत. त्यामुळे या दोघांनाही अपात्र ठरवावे. याच दरम्यान गाडे यांनी मुदत संपल्यानंतर त्यांचे प्रमाणपत्र सादर केले.


जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी या दोघांचेही म्हणणे फेटाळत, काकडे यांची तक्रार मान्य करून भूतलक्ष्यी प्रभावाने दोघांना अपात्र ठरविले आहे.
याबद्दल काकडे म्हणाले, ""माने यांनी बनावट कागदपत्रे नाशिक येथील जातपडताळणी कार्यालयात जमा केली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरविले असले, तरी सरकारने बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

SCROLL FOR NEXT