पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्वर : ...अखेर वाधवानांची इच्छा पुर्णत्वास

सकाळ वृत्तसेवा

सातारा : येस बॅंक घोळाप्रकरणातील प्रमुख आरोपी व उद्योगपती वाधवान बंधुंना ताब्यात घेण्यासाठी आज सकाळी ईडीचे पथक पाचगणीत दाखल झाले. पण जिल्हा प्रशासनाने वाधवान कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या हातावर होम कोरंटाईनचे शिक्के मारून महाबळेश्वरातील वाधवान हाऊस या बंगल्याकडे नेण्यात आले. त्यांना 14 दिवसांच्या होम कोरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, काल (बुधवारी) सीबीआयच्या न्यायालयाने वाधवान कुटुंबियांना पाच मेपर्यंत महाबळेश्वर सोडू नये असे आदेश दिले आहेत. पण जिल्हा प्रशासनाने वाधवानचा मुक्काम आणखी 14 दिवस महाबळेश्वरातच ठेवला आहे. 

येस बॅंक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी व प्रसिध्द उदयोगपती वाधवान बंधु हे आपल्या कुटूंबासह 20 मार्च रोजी मुंबईहुन लोणावळयाजवळील तुंगार्ली येथील पिकॉकव्हॅली सोसायटी मधील बंगल्यात राहण्यासाठी आले. प्रारंभी त्यांनी सहा दिवसांसाठी हे दोन बंगले बुक केले होते. परंतु त्याचवेळी देशात लॉकडाउन जाहीर झाल्याने वाधवान कुंटूब हे लोणावळयातच अडकले होते. त्यांनी काही दिवसांचे आरक्षण वाढविले परंतु बंगले खाली करण्यासाठी बंगले धारकाने तगादा लावल्याने आठ मार्च रोजी वाधवान बंधु यांनी लोणावळा सोडुन महाबळेश्वर येथील आपल्या दिवान व्हीला या बंगल्यात येण्याचा निर्णय घेतला. येताना वाधवान बंधु यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र घेतले. या पत्रामुळे वाधवान बंधु यांचा लोणावळा ते महाबळेश्वर हा प्रवास सुकर झाला असला तरी वाधवान ंबंधु यांना प्रवासासाठी पत्र देणे हे गुप्ता यांच्या चांगलेच अंगलट आले. गुप्ता यांना राज्य शासनाने तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. 

यस बॅंक आर्थिक घोटाळयातील आरोपी वाधवान बंधु हे जिल्हाबंदी ओदश झुगारून महाबळेश्वर येथे आल्याचे प्रशासनाला समजताच प्रशासनाने त्यांची चौकशी केली. वाधवान यांच्यासह एकुन 23 जणांची वैदयकिय तपासणी करण्यात आली. सुदैवाने तपासणीत कोणीही कोरोना पॉझिटीव्ह आढळुन आला नाही. तरीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाधवान यांचे बरोबर आलेले 23 जणांना नऊ एप्रिलपासुन पांचगणी येथे इन्स्टिटयुशनल क्वारंटाईन केले. याची मुदत 22 एप्रिलला काल संपल्यानंतर आज दुसऱ्या (गुरूवारी) दिवशी दुपारी जिल्हा प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी केली तसेच त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन असे शिक्के मारले. त्यानंतर बेलएअर हॉस्पिटलच्या दोन बसमधून चोख पोलिस बंदोबस्तात महाबळेश्वरातील दिवाण व्हिला या वाधवान यांच्या निवासस्थानी मुक्कामी रवाना केले. या बंगल्यात ते पुढील 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. 

अटकेपुर्वीच वाधवानांच्या सुटकेचे रंगलंय राजकारण

Breaking : एसपी तेजस्वी सातपुते भडकल्या; म्हणाल्या तुम्हांला पश्चाताप हाेईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

SCROLL FOR NEXT