पश्चिम महाराष्ट्र

'या' गावात कोरोनासह आता ग्रामस्थांना बिबट्याची भीती; कुत्र्याला फाडला

सकाळ वृत्तसेवा

भिलार : रांजणी व वहागाव (ता. जावळी) या गावांच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी वहागाव येथे बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला चढवत त्याचा प्राण घेतला. यामुळे "कोरोना'घरातून बाहेर पडू देईना आणि बिबट्या भीतीने घरात बसू देईना, अशी विचित्र अवस्था नागरिकांची झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की रांजणी, वहागाव, राघववाडी या गावांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात असून, काल वहागाव येथील नथुराम कांबळे यांच्या पाळीव कुत्र्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला चढवला. त्यात बिबट्याने कुत्र्याच्या नरडीचा घोट घेऊन त्याचा प्राण घेतला. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या कोरोनामुळे संचारबंदी असल्याने लोकांना घराबाहेर पडणेही मुश्‍किल झाले असताना बिबट्याच्या संचाराने आणखीन भीती निर्माण झाली आहे.

वहागाव, रांजणी आणि राघववाडी ही महू धरणात पूर्णपणे विस्थापित झालेली गावे आहेत. त्यामुळे बहुतांश लोक विस्थापित होऊन इतरत्र गेलेले आहेत. त्यामुळे वहागावमध्ये अत्यल्प लोक वास्तव्य करत आहेत. या तुटपुंज्या ग्रामस्थांमध्ये बिबट्याने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. काल रात्री गावाच्या मुख्य वस्तीत असणाऱ्या वहागावच्या मंदिरापासून बिबट्या खाली धरणाच्या दिशेने जाताना पाहिला असल्याची चर्चा सुरू आहे. रात्रीत लोक बिबट्याच्या भीतीने झोपतही नाहीत. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त वन विभागाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची उद्धव सरकारपुढे आर्त हाक

फक्त एका फाेनवर ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना मिळणार घरपोच पेन्शन 

आमच्या गावच्या पेंढा नावाच्या शिवारातून हा बिबट्या गावात प्रवेश करत असून, परवा कुत्र्याचा फडशा पाडल्यानंतर नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. अगोदरच गावात लोक कमी आहेत आणि त्यातच कोरोनाने घरात बसावे लागत आहे, पण नुसता आवाज झाला तरी लोक बिबट्या आला म्हणून घराबाहेर धाव घेताहेत. वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करून लोकांना भयमुक्त करावे, अशी आमची मागणी आहे.

-विक्रम रांजणे, ग्रामस्थ, वहागाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT