पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : सातारा जिल्ह्यात दाेन युवकांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

सातारा : मार्च महिन्यात नागपूर वरून प्रवास करून आलेल्या 35 वर्षीय तरुणाला कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे घसा दुखत असल्यामुळे आणि तापेमुळे  दाखल केले होते. त्याचा आज (रविवार) अहवाल आला असून तो कोरोना बाधित निघाला आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 30 वर्षीय पुरुष जो गेल्या महिन्यात पुण्यावरून आला होता, त्याला ताप आणि घसा दुखत असल्यामुळे भरती केले होते त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे. हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान रुग्णालयात दाखल असलेल्या या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

कऱ्हाड : तालुक्यातील उंब्रज जवळील चरेगाव आणि ओगलेवाडी जवळील बाबरमाची येथील दोन रुग्णांचे अहवाल आज पॉझीटीव्ह आले. एकाचवेळी दोन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे. दरम्यान संबंधित दोन्ही ठिकाणच्या संशयीताच्या संपर्कातील लोकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभागाकडुन कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान पोलिसांनीही संबंधित ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला असुन त्या परिसरातील सर्व रस्ते सील करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. कऱ्हाड तालुक्यातील पहिल्यांदाच सापडलेला तांबवेतील कोरोना बाधीत युवक बरा होवुन कालच त्याला टाळ्यांच्या गजरात घरी सोडण्यात आले. त्यानंतरही दोन रुग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान आज बाबरमाची आणि चरेगाव येथील दोन रुग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे.

Lockdown : सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे : शेखर सिंह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'

Shehzad Poonawalla Resignation : पंतप्रधान मोदींचे कट्टर समर्थक शहजाद पूनावाला यांचा भाजपचा राजीनामा; राष्ट्रीय प्रवक्त्याने पक्ष का सोडला?

Bhiwandi Building Collapse: आम्ही बाहेर पडलो, पण आमची लेक ढिगाऱ्याखालीच अडकली अन्..., भिवंडी दुर्घटनेतील पीडितांनी सांगितला थरार!

Latest Marathi News Live Update : चाकण-शिक्रापूर मार्गावर कंटेनर बंद पडण्याचे प्रकार वाढले; वाहतूक पूर्णपणे जाम

Nagpur Accident News: भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू; नवरगाव शिवारातील घटना; मद्यधुंद चालक अटकेत

SCROLL FOR NEXT