पश्चिम महाराष्ट्र

बाप रे ! हे काय चाललंय सातारा जिल्ह्यात

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची येथील आणखी आठ व साेनके येथील बधितांच्या सहवासातील साकुर्डी (ता.कराड) दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आज (बुधवारी) आलेल्या आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे.
काेराेना बाधितांची वाढती संख्या कराड तालुक्यासह पुणे विभागासाठी एक मोठा धक्का आहे. सातारा जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 92 इतकी झाली असून कराड तालुक्याची 71 इतकी संख्या झाली आहेत.

कऱ्हाड तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढु लागले आहे. बाबरमाची येथे एक रुग्ण सापडला. त्यानंतर तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथे सुरू झालेली कोरोना बाधितांची साखळी थांबायला तयार नाही.  दोन्ही ठिकाणची कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तेथील रुग्ण सर्वाधिक असल्यामुळे दोन्ही ठिकाण कोरोनासाठी हॉटस्पॉटच झाली आहेत. कराड तालुक्यात आज (बुधवारी) सकाळच्या टप्प्यात वनवासमाची येथील आठ तर साकुर्डी येथील दोन अशा 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान कराड तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. गेली काही दिवसापासून येथील कोरोना बाधिताची साखळी तुटता तुटेना ती वाढतच चालली आहे. यातच भर कोरेगाव तालुक्यातील कोरोना बाधिताची भर पडली आहे. संबंधित मजुर हा कराड तालुक्यातील साकुर्डी येथील डोगंरी माळ नावाच्या शिवारात असलेल्या विटभट्टीवर आपली गाढवे घेऊन मजुरीचे काम करत होता. गेली एक महीन्यापासून कोरोना मुळे लाँकडाऊन व संचार बंदी असल्याने विटभट्टीवरील कामही बंद होते.

बारा दिवसांपुर्वी तो मजुर आपली गाढवे घेऊन चालत कोरेगाव येथे त्याच्या गावी गेला. त्याला गावात न घेता काँर्नटांइन केले होते असे समजते. त्याचा अहवाल पाँझीटिव्ह आला. तो साकुर्डी येथील डोंगरी माळावरील विटभट्टीवर काम करत होता. ही माहिती लागताच प्रशासनाने हालचाली करुन त्या विटभट्टीवरील ४७ लोकांना काँर्नटांइन केले होते.

दरम्यान आज बुधवारी सकाळी संबंधित बाधिताच्या सहवासातील आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे या भागात खळबळ उडालीआहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता देशमुख, सुपणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहा हुंदरे, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी साकुर्डीत दाखल झाले असून त्यांनी संबंधित ठिकाणचा परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

याबराेबरच फलटण येथील दाेन नागरिकांचा अहवाल कारोना (कोविड-19) बाधित आला आहे. यापैकी 11 निकट सहवासित असून फलटण येथील कोरोना केअर सेंटर मधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


116 जाणांचे अहवाल निगेटिव्ह

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 48 आणि कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 68 असे एकूण 116 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचेही बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सातारा, कऱ्हाडात निर्बंधावर जिल्हाधिकारी ठाम, ग्रामीण भागाला दिलासा

जमीन वहिवाटीवरुन शेतकऱ्याचा खून; 17 जण अटकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

Deglur Accident: देगलूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

SCROLL FOR NEXT