polic patil 
पश्चिम महाराष्ट्र

तब्बल 33 हजार जणांच्या जीवाला धोका?

सकाळ वृत्तसेवा

विंग (जि. सातारा) ः कोरोनाविरुद्धच्या लढाईत गावोगावच्या पोलिस पाटलांवर मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाच्या खंद्याला खंदा लावून ते या लढ्यात आहेत. जिवाची पर्वा न करता जिल्ह्यात सुमारे अकराशे, तर राज्यात 33 हजार पोलिस पाटील सुरक्षा कवच नसतानाही या लढ्यात सामील आहेत. जनतेला शिस्त लावताना संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 
कोरोना संकटाचे थैमान देशात व राज्यात सुरू आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शासनाने लॉकडाउन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरोधात लढा देत आहेत. स्थानिक पातळीवरील पोलिस पाटीलही त्यात समाविष्ट आहेत. जनता व प्रशासनात समन्वय साधण्याचे काम ते करत आहेत. जनतेला शिस्त लावताना मात्र त्याची दमछाक होताना दिसते. डोळ्यात तेल घालून ते दिवस- रात्र ते झटताहेत. जिल्ह्यात सुमारे अकराशे पोलिस पाटील आहेत. जबाबदारीने ते काम पाहात असल्याचे गावोगावचे चित्र आहे. राज्यात 33 हजार पोलिस पाटील या लढ्यात सहभागी झालेत. जिवाची पर्वा न करता प्रशासनाच्या खंद्याला खंदा लावून ते झुंज देत आहेत. 
शासन आदेशाची अंमलबजावणी करताना अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. महत्त्वाच्या नोंदी त्यांना ठेवाव्या लागत आहेत. प्रशासनाने गावोगावी कोरोना ग्रामस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व समिती सदस्याच्या मदतीने कार्यवाहीची महत्त्वपूर्ण भूमिका पोलिस पाटील बजावत आहेत. परिणामी जनतेच्या रोषाला अनेकदा त्यांनाच सामोरे जावे लागते. एखादी- दुसरी मोठी कारवाई केलीच, तर प्रशासनाकडून सहकार्य मिळलेच, असे नाही. त्या वेळी स्वतः जबाबदारी ते स्वीकारत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम जाणवत आहे. ठिकठिकाणी पोलिस पाटलांना शिवीगाळ, दमदाटी झाल्याच्या घटना समोर येत आहेत, तरीही सर्व त्रास सहन करून त्यांचा लढा सुरूच आहे. तुंटपुज्या पगारावर ते राबत आहेत. तोही वेळेवर मिळेल यांची खात्री नाही. कोरोनाच्या लढ्यात जनतेला शिस्त लावताना संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्याचे आव्हान सध्या त्यांच्यासमोर आहे. 


सुरक्षा म्हणून पोलिस पाटलांना 25 लाख विमा कवच शासनाने जाहीर करावा. सानुग्रह अनुदान म्हणून मासिक किमान दोन हजार रुपये द्यावेत. इतरांप्रमाणे शासनाने कार्याची दखल घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी परिपत्रक काढून त्याचे कौतुक करावे, किमान शाबासकी द्यावी. तसे निवेदन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे. 

- बाळासाहेब शिंदे, राज्याध्यक्ष, गावकामगार पोलिस पाटील संघटना 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT