पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : लोकप्रतिनिधीही घरातच थांबून; दोनच आमदारांनी सुचविली विकासकामे

उमेश बांबरे

सातारा : कोरोनामुळे केलेल्या लॉकडाउनचा फटका शासकीय कामांना बसला आहे. विविध शासकीय विभागांकडून होणारी कामे मंजुरीची प्रक्रिया थांबली. त्यामुळे नियोजित विकासकामांसाठी निधी देण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही. परिणामी जिल्ह्यातील विकासकामांना तूर्त तरी ब्रेक बसला आहे. लॉकडाउन उठल्यानंतर साधारण मे किंवा जूनमध्ये नियोजन समितीकडून निधीचे वाटप होऊ शकणार आहे. 

मार्चमध्ये नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर एप्रिल, मे मध्ये सर्व शासकीय विभाग आपापल्या विभागाशी संबंधित विविध कामांचे अंदाजपत्रक करून ते मंजुरीसाठी नियोजन समितीकडे पाठवितात. त्यानंतर नियोजन समितीकडून निधीचे वाटप होते. त्यानंतर कामांना सुरवात होते. या वर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रसार आपल्या राज्यात व देशात सुरू झाला आहे. परिणामी शासनाने लॉकडाउनचा पर्याय निवडला. त्यामुळे सर्व यंत्रणा जाग्यावरच थांबली आहे. याचा परिणाम शासनाच्या विकासकामांवरही झाला आहे. हा परिणाम जूनपर्यंत राहणार असल्याचे काही अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

जिल्ह्याचा सर्वसाधारण वार्षिक आराखडा 2020-21 साठी 265 कोटींचा होता. त्यामध्ये वाढीव 60 कोटी मिळाल्यामुळे 325 कोटींचा आराखडा झाला आहे. हा निधी वाटप करताना विविध विभागांकडून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांनुसार अंदाजपत्रक केले जाते. मार्च, एप्रिलमध्ये ही प्रक्रिया चालते. त्यानंतर ही कामे मंजुरीसाठी नियोजन समितीकडे येऊन मंजुरी मिळाल्यानंतर निधी वाटप होते. यावर्षी कोरोनामुळे सर्व विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अल्प असल्याने कामे मंजुरीची प्रक्रियाच थांबली आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल झाल्यावरच कामांचे अंदाजपत्रक तयार होऊन ती मंजुरीसाठी नियोजन समितीकडे येतील. त्यानंतर त्यांना निधी वाटप होईल. त्यासाठी मे, जून उजाडणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी नियोजन समितीच्या कामांना ब्रेक लागल्याचे चित्र आहे. 

दोनच आमदारांनी सुचविली कामे 

सध्या माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण या दोघांकडून कामे सुचविल्याचे पत्र नियोजन समितीला मिळालेले आहे. उर्वरित सहा आमदारांकडून कोणतीही कामे सुचविली गेलेली नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधीही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरात थांबून असल्याचे चित्र आहे. 

शेतकऱ्याचा दिलदारपणा दोन टन टोमॅटो मोफत दिले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विरोधकांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रणच नाही; जयराम रमेश म्हणतात, एक तृतीयांश पंतप्रधान...

PM Modi's Swearing-In Ceremony: एकदम थाटात! शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा पहिला व्हिडिओ समोर

Exit Poll Plea: 'एक्झिट पोल'वाले येणार गोत्यात? 'या' प्रकरणात चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

French Open 2024 : इगा स्वैतेकची हॅट्ट्रिक; तिसऱ्यांदा कोरलं फ्रेंच ओपनवर नाव

Dhananjay Munde: बीडवासीयांनो, माझी हात जोडून विनंती... व्हिडिओ पोस्ट करत धनंजय मुंडे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT