corona satara 
पश्चिम महाराष्ट्र

सातारकरांची झोप उडाली; कोरोनाचे 20 रुग्ण वाढले

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीत असे 20 जणांचे अहवाल आज मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील बनपुरी येथील क्वारंटाईन मध्ये अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी तब्बल 28 कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या 166  झाली आहे.                                                                

सातारा जिल्ह्यात आज मंगळवारी कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली  येथील आणखी चार रुग्णांना तर शामगाव आणि चरेगाव जवळील खालकरवाडी येथील प्रत्येकी एक तर पाटण तालुक्यातील बनपुरी येथील काल मृत्यू झालेल्या महिलेचा आणि कोयना विभागातील शिरळ येथील  अहमदाबादवरून प्रवास करून आलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान म्हासोली येथील नव्या साखळीने डोके वर काढले असून कराड तालुक्याची चिंता वाढवली आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधित संख्या वाढून आज (मंगळवारी) रात्री ती 107 झाली आहे.

कऱ्हाड तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण चार दिवसांपासून वाढु लागले आहे.  तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील कोरोनाची बाधितांची संख्या कमी येत असतानाच उंडाळे विभागातील म्हासोली येथील कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. चार दिवसांपूर्वी पुण्याहून आलेल्या म्हासोलीतील एकाला कोरोनाची लागण झाली.  यानंतर त्याच बाधिताच्या कुटुंबाला कोरोनाने ग्रासले आहे. तर यापूर्वी तीन रुग्ण सापडले होते आज सकाळीत्यात आणखी पाच रुग्ण सापडले.

रात्री पुन्हा त्यात चार रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे म्हासोली येथे नवी साखळी निर्माण झाल्याचे दिसत आहे.  त्यामुळे  म्हासोली गावाने तालुक्याची चिंता आणखीच वाढवली आहे. संबंधित ठिकाणची साखळी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने तालुक्याच्या काळजीत आणखीच भर पडली आहे.

कऱ्हाड तालुक्यातील शामगाव येथील एका व चरेगाव जवळील खालकरवाडी येथील एका रुग्णाला बाधा झाली आहे. दरम्यान पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील बनपुरी येथील एका महिलेचा काल विलगीकरण पक्षात असताना मृत्यू झाला होता. संबंधित महिलेचा रिपोर्ट आज आरोग्य विभागाच्या तपासणी पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर कोयना विभागातील शिरळ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित व्यक्ती हा अहमदाबाद वरून प्रवास करून आल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित ठिकाणी पोलिसांनी सूक्ष्म कंटेनमेंट झोनअंतर्गत कार्यवाही करून रस्ते सील केले आहेत.सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीतांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  गडीकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT