पश्चिम महाराष्ट्र

वाईला धक्का : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा आठवा बळी

सकाळ वृत्तसेवा

सातारा- कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात आज (साेमवार) आठव्या काेराेनाबाधिताचा मृत्यू झाला. मृत्यू झालेली व्यक्ती ही वाई तालुक्यातील आसले येथील आहे. ते मुंबईतून वाई येथे नुकतेच आले हाेते. अन्य एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. ती व्यक्ती देखील वाई तालुक्यातीलच आहे. दरम्यान आज कृष्णा रुग्णालयातून दाेन जण काेराेनामुक्त झाले आहेत. हे दाेघे वनवासमाचीतील असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या वनवासमाचीतील कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले. त्यापाठोपाठ आरोग्य यंत्रणेनेही घेतलेल्या मेहनतीमुळे वनवासमाची कोरानामुक्तीच्या वाटेवर आहे. येथील कृष्णा हॉस्पिटलमधून वनवासमाचीतील दोघेजण कोरोनामुक्त झालेल्यांना आज डिस्चार्ज मिळाला. यात 24 वर्षीय युवकासह 75 वर्षीय वृद्धेने कोरोनावर मात करण्यात यश मिळवले. त्यामुळे वनवासमाचीत सापडलेल्या 39 पैकी 38 जण कोरोनामुक्त होवून घरी परतल्याने लवकरच वनवासमाची कोरानामुक्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

येथील कृष्‍णा हॉस्पिटलमधून या दोन्ही कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कृष्णा रूग्णालयातून कोरोनामुक्त होवून डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 56 झाली आहे. आज युवक व वृध्देच्या डिस्चार्जवेळी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी या संबंधितांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर आदींसह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते. वनवासमाचीतील कोरोनाच्या साखळीमुळे प्रशासन हैराण झाले होते. एका पाठोपाठ एक रूग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणाही अवाक झाली होती. या गावात 39 कोरोना बाधीत आढळले. त्यामुळे छोट्याशा गावात मोठ्या संख्येने रूग्ण सापडल्याने जिल्ह्याचेच नव्हे तरा राज्यात या गावाचे नाव पोहचले. मात्र आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीमुळे व प्रशासनाने साखळी तोडण्यात यश मिळाल्याने वनवासमाची कोरोनामुक्तीच्या मार्गावर पोहचली आहे. आज दोघांना डिस्चार्ज मिळाल्याने या गावातील अवघा एकच रूग्ण उपचार घेत आहे. त्याच्या कोरोनामुक्तनंतर गावही कोरोनामुक्त होणार आहे. 

पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही सूचना पाेचवा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

खतप्रकल्पाअभावी हुकले पालिकेचे मानांकन

काय सांगता? तुमच्याकडेही कर्ज वसुलीचा तगादा?

पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाडळीतील शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले चीज 

दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आज वाई तालुक्यातील आसले येथील 70 वर्षीय मधुमेह असलेल्या कालच (रविवार) कोरोनाबाधित म्हणून आढळून आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाई तालुक्यातील जांभळी येथील 52 वर्षीय मधुमेह असलेल्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे. कोरोना अनुमानित म्हणून त्याचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

गडीकर म्हणाले मृत्यू झालेले दोघेही मुंबईवरुन प्रवास करुन आलेले होते. त्यांना मधुमेह व श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबराेबरच 184 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 64, वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुगणालय कराड येथील 55, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 48  व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 5 अशा एकूण 184 अनुमानित नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

एफ-२ वाघिणीचा ‘फॅमिली टाइम’; चार बछड्यांनी वेधलं वन्यजीवप्रेमींचे लक्ष, पाहा VIDEO

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT