Mhaswad
Mhaswad 
पश्चिम महाराष्ट्र

बत्तासभाऊ लई झ्याक... सांगा समद्यास्नी...

सकाळ वृत्तसेवा

म्हसवड (जि. सातारा) : नोकरीनिमित्त शहरी भागात स्थायिक राहिलेले ग्रामस्थ कोरोनाच्या साथीचा वाढता प्रभावामुळे आपल्या गावाकडे धाव घेऊ लागले आहेत; परंतु गावातीलही नातलग व ग्रामस्थ कोरोनाच्या धास्तीने त्यांना गावात स्वीकारत नसल्याच्या घटना गावोगावी नित्याच्या झालेल्या आहेत. 

कोरोना रोगाची साथच अशी आहे. या साथीने सर्व मित्र परिवार आणि नात्यागोत्यासह ग्रामस्थांमधील दुरावा वाढविण्याचे कार्य करत असल्याचे गावागावचे वास्तवचित्र पाहून श्री. सावंत यांनी गावी पत्नी, मुलांसमवेत गावात येताच ग्रामसमितीस कल्पना देऊन गावाबाहेरील शेताचा रस्ता धरला आणि शेतातील झाडाखालीच आपल्या कुटुंबासमवेत 14 दिवस मुक्काम ठेवण्याचा निर्णय घेतला. 

वादळी वारा व पावसापासून आपले कुटुंब सुरक्षित राहावे, यासाठी त्यांनी सोबत स्वत:चा टेंपो शेतात नेला असून, दिवसा झाडाखालील सावलीत स्वयंपाक, जेवण व रात्री टेंपोमध्ये मुक्काम असा दिनक्रम त्यांचा सुरू आहे. पुळकोटीच्या सरपंच मंदाकिनी सावंत यांनीही श्री. सावंत व त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन करून इतर गावातीलही ग्रामस्थांनी श्री. सावंत कुटुंबाचा आदर्श घेऊन आपले गाव व आपले कुटुंबही कोरोनापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन केले. 

सध्या कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना, बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाने सद्यस्थितीचा विचार करुन, बत्तासभाऊंसारखाच निर्णय घ्यावा, असे सहज शक्‍य नसले तरी कमीत कमी आपल्यामुळे अन्य कुटुंबियांना व ग्रामस्थ, तसेच शहरवासियांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT