पश्चिम महाराष्ट्र

'त्या' केवळ लढल्याच नाही तर जिंकल्याही

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य सेविकाच कोरोनाबाधित झाल्या. त्यामुळे रुग्णांबरोबर त्यांच्यावरही उपचार करण्याची वेळ आली. उपजिल्हा रुग्णालय आणि सह्याद्री हॉस्पिटलमधील तब्बल 14 दिवसांच्या उपचारानंतर संबंधित आरोग्य सेविकांनी ही कोरोनाची लढाई जिंकली. त्यांच्यासह वनवासमाची येथील एका दहा वर्षांचा मुलगा असे सहा जण गुरुवारी कोरोनामुक्त झाले. त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमधून आज टाळ्यांच्या गजरात घरी सोडण्यात आले.
 
कोरोनामुळे कऱ्हाड हॉटस्पॉट बनले होते. त्यामुळे कऱ्हाडवर सर्वांचेच लक्ष लागले आहे. जेवढ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. तेवढ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचेही प्रमाणही वाढत आहे. त्यासाठी कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर, कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत 27 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे, तर यापूर्वी उपजिल्हा रुग्णालयातील चार रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड करण्यात आल्यामुळे तेथील रुग्णांना सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील पाच नर्सचाही समावेश होता. ते उपचार सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने तेथील रुग्ण सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याचे आदेश दिले. त्यानुसार तेथील 31 रुग्णांना तेथे हलवण्यात आले. त्यातच वनवासमाची येथील रुग्णांवरही उपचार सुरू होते. त्यातील पाच नर्स आणि वनवासमाचीतील एक रुग्ण बरा झाल्याने त्यांना गुरुवारी सह्याद्री हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले.

या वेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. जी. काटकर, डॉ. सुनील कोरबू, सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक अमित चव्हाण, वैद्यकीय प्रमुख डॉ. वेंकटेश मुळे, सहायक व्यवस्थापक विश्वजित डुबल आदी उपस्थित होते. दरम्यान चौदा दिवस कऱ्हाडला कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या उंब्रज येथील 28 वर्षीय युवतीचे गावात पुष्पवृष्टी करून स्वागत झाले. पुष्पवृष्टीसह टाळ्यांचाही गजरही केला. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा थांबून नागरिकांनी तिच्यावर पुष्पवृष्टी केली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, उपसरपंच अजित जाधव, विजयराव जाधव, संग्रामसिंह पलंगे, ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ, पोलिस व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. संबंधित युवती उपजिल्हा रुग्णालयाची कर्मचारी आहे. 30 एप्रिलला तिला कोरोनाची बाधा झाली होती. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. युवतीच्या संपर्कातील निकटवर्तीयांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
 

दिडशे जणांचे अहवाल निगेटिव्ह 

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या दिडशे जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील 50, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातील 77, कृष्णा हॉस्पिटलमधील 2, वाई ग्रामीण रुग्णालयातील 7 व फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 14 जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 122 जणांना कोरोनाचे संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यातील 118 जणांना जिल्हा रुग्णालयात, तर चौघांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

गणपतीबाप्पा... कसं रे होणार..! 

Video : होम क्वारंटाईनचा नियम पाळा अन्यथा... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT