पश्चिम महाराष्ट्र

कॉन्स्टेबलच्या पत्राची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शौर्य आणि पराक्रम हे तर साताऱ्याची परंपरा आहे. संकट मग ते कोणतेही असो निधड्या छातीने संकटांना सामोरे जाण्याचा गुण येथील माणसांच्या रक्तात भिनलेला आहे. मग सारा समाज कोरोनाच्या भिंतिंच्या सावटाखाली असताना सुट्टी घेवून घरात बसेल कसा ? त्यामुळेच साताऱ्यातील दोन पोलिसांनी सुट्टी न घेता अहोरात्र सामान्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.  

सातारा पोलिस दलात कार्यरत असणारे येथील निलेश दयाळ आणि सागर गोगावले या दोघांनीही 'आम्ही कोरोनाच्या काळात सुट्टी घेणार नाही." असे पत्राच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना कळविले. हीबाब दस्तूरखूद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पाेचली. त्यांनी दाेन्ही पाेलिसांचे ट्विटच्या माध्यमातून नुकतेच कौतुक केले आहे. या दाेन्ही कॉन्स्टेबलच्या पत्राची दखल चक्क गृहमंत्र्यांनी घेतल्याने दाेघांनीही खूप आनंद झाला आहे. याबाबत निलेश दयाळ म्हणाले मंत्री महाेदय यांनी आमचे केल्याने काम करण्याचा हुरूप वाढला आहे. सामान्यांची सेवा करण्यात अधिकाधिक आनंद मिळेल.  

निलेश आणि सागर हे सातारा नजकीच्या शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. कोरोनाच्या विरोधातील लढाईत साताराच्या पाेलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या स्वतः ग्राऊंड रियालीटी तपासतात आणि आम्हांस देखील याेग्य ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी आपण एकही दिवस घरी बसणे याेग्य ठरणार नाही असा विचार मनात आला. मग आम्ही दाेघांनी तसा निर्धार केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांना आमचा निर्णय कळवला. त्याची दखल राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली हीबाब आम्हांला नुकतीच कळाली. आता कोरोनाचे संकट आहे तोवर एकही सुट्टी न घेता आम्ही या लढाईत आमचे योगदान देणार आहोत असे निलेश यांनी नमूद केले. 

या दाेन्ही पाेलिसांचे पत्र बहुधा व्हायरल झाले. ते पत्र सामाजिक कार्यकर्ते शिवराम कोंडीबा ठवरे यांनी काही दिवसांपुर्वी ट्वीट केले होते. या ट्वीटची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. त्यांनी या दोन पोलिसांचे कौतुक केले.
 

'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहुपूरी पोलीस ठाणे येथे बंदोबस्तावर असणाऱ्या निलेश महेंद्र दयाळ आणि सागर दिलीप गोगावले यांनी कोरोना नियंत्रणात येईपर्यंत एकही सुट्टी घेणार नसल्याचा निर्धार केला आहे. या दोघांची कर्तव्याप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी आहे,' अशा शब्दांमध्ये गृहमंत्र्यांनी दोघांचे कौतुक केले आहे.

हुशश ! महाबळेश्वर आजही काेराेनामुक्तच; कैदी सुरक्षित स्थळी नेले

शेळ्या-मेंढ्यांनाही मिळाला ही सवलत

...त्यांची घरवापसी, गावागावांत धास्ती?

घरीच रहा सुरक्षित रहा ;शाळा प्रवेशाची काळजी करु नका. सविस्तर बातमी वाचा कधी हाेणार प्रक्रिया सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT