Entry Pass 
पश्चिम महाराष्ट्र

कलेक्‍टर साहेब कितीदा काढायचा पास?

संजय जगताप - सकाळ वृत्तसेवा

मायणी (जि. सातारा) : दैनंदिन गरजा भागविण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना वारंवार जिल्हा हद्दी ओलांडून ये- जा करावी लागते. त्यामुळे ऑनलाइन पास काढण्याऐवजी स्थानिकांना आधारकार्ड, ओळखपत्र वा अन्य पुराव्याच्या आधारे शेजारील गावांत ये-जा करण्याची मुभा मिळावी अशी मागणी होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा हद्दी बंद केल्यात. रहदारीच्या मार्गावर ठिकठिकाणी चेक पोस्ट आहेत. तर अनेक रस्ते बंद केले आहेत. सीमाभागातील गावांना जोडणारे छोटे मोठे रस्ते व चोरवाटाही बंद केल्या आहेत. त्यासाठी रस्त्यांवर डबर, काटेरी झाडेझुडपे टाकली आहेत. चेकपोस्टवर पोलिसांचा खडा पहारा आहे. आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. वाहने अडवून सर्वांगीण चौकशी केली जात आहे. विहीत पासाची मागणी करण्यात येत आहे. त्याची आवश्‍यकताही आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, फैलाव रोखण्यासाठी तशी खबरदारी घ्यायलाच हवी. मात्र सीमाभागातील अनेक लोकांना शेजारील परजिल्ह्यातील गावांत दैनदैन गरजा भागविण्यासाठी वारंवार जावे लागते. 

किराणा माल, भाजीपाला, पिठाची गिरणी, मेडिकल स्टोअर्स, वैद्यकीय सुविधा, शेतीमालाची खरेदी विक्री, खते, औषधे, बी-बियाणे, बॅंकांतील कामे, पेट्रोल- डिझेल भरणे अशा अनेक कामांसाठी सीमेबाहेरील गावांत येजा करावी लागते. मात्र ऑनलाईन पासअभावी अडचणी येतात. पास काढण्याची सोयही खेड्यापाड्यात नाही. मग कसा, कुठून आणि कितीवेळा पास काढायचा, असा सवाल नागरिक करीत आहेत. त्यासाठी कलेक्‍टर साहेबांनी केवळ सीमाभागातील नागरिकांसाठी अन्य पर्याय द्यावा. तास- दोन तासांच्या कामासाठी स्थानिकांना पासाची सूट द्यावी. त्याऐवजी त्यांचे आधारकार्ड, ओळखपत्र, रहिवासाचा पुरावा पाहुन ये जा करण्याची मुभा द्यावी. तसेच, शाळांचे मुख्याध्यापक व काही अन्य कार्यालय प्रमुख हे शेजारील जिल्ह्यात सीमाभागातील गावांत राहण्यास आहेत. कार्यालयीन कामांसाठी त्यांना वरचेवर हद्द ओलांडून ये- जा करावी लागते. अशा कार्यालय प्रमुखांनाही चेक पोस्टवरुन आवश्‍यक ते ओळखपत्र वा कार्यालयीन पुरावा पाहुन ये-जा करण्याची मुभा देण्याची आवश्‍यकता आहे. 

मायणीलगतच्या परंतु सांगली जिल्ह्यातील माहुली, वलखड, भिकवडी आदी गावांतील लोकांना बाजारहाटासाठी येथेच यावे लागते. शेती मालाची खरेदी-विक्री, बी-बियाणे, खते, औषधे, आरोग्य सुविधा आदीसाठी अन्य पर्याय नाही.

तसेच सातारा जिल्ह्यातील मायणीसह चितळी, विखळे, कलेढोण, पाचवड, म्हासुर्णे, निमसोड (ता. खटाव) परिसरातील लोकांना सोनोग्राफी, एक्‍सरे, महत्वाची औषधे, तज्ञ डॉक्‍टरांची वैद्यकीय सेवा, धान्यबाजार आदीसाठी विटा (जि. सांगली) येथील बाजारपेठेत जावे लागते. त्यामुळे वारंवार पास काढणे शक्‍य होत नाही. म्हणूनच लोक कलेक्‍टर साहेबांना साकडे घालत आहेत. स्थानिकांना महत्वाच्या कामांसाठी पासाशिवाय ये-जा करण्याची मुभा देण्याची मागणी होत आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT