पश्चिम महाराष्ट्र

त्याच्या नरड्यावर सुरी फिरणार ताेच सायरन वाजला अन्‌...

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः गावापासून दूर शिवारात, रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात सारी तयारी जय्यत केली होती. धारधार सुराही तयार ठेवला होत. जवळच्या ओढ्यातील बेडकांचा अन्‌ रातकिड्यांच्या किरकिरीचा फक्त आवाज होता. बाकी सारी निरव शांतता. आजूबाजूच्या झाडीतून, ओढ्यातून ते आठ-दहा जण लपतछपत त्या झाडाखाली आले. दोघा-तिघांनी धरून आणलेल्याला पाणी पाजले अन्‌ त्याच्या नरड्यावर सुरी फिरवणार... 

तोच पोलिसांच्या गाडीचा आवाज आला अन्‌...वाट मिळेल तिकडे सारेजण शिवारात ओढ्या वगळीने पळत सुटले. हो.. ओरडू नये म्हणून तोंड बांधून, जिवापाड जपून आणलेल्या बोकडाचीही कुणी काळजी केली नाही. बिचारे अंधारात चाचपडत कोठे गेले ते त्याचे त्यालाही कळले नाही. अगदी पोलिसांनाही सापडले नाहीत. पोलिसांच्या सायरनने खवैय्यांच्या उपहाराचा अपहार झाला. खवैय्यांच्या मनसुब्यावर पोलिसांच्या सायरनने पाणी फिरवले. 

ही घटना आहे, सातारा तालुक्‍यातील एका छोट्या गावातील. कोरोनामुळे देशात सर्वत्र संचारबंदीमुळे नागरिकांवर अनेक बंधने आली आहेत. अगदी मटण खाण्यावरही नियंत्रण आले आहे. कारण बोकड कापून विकण्यास परवानगी नाही. त्यामुळे सामिष खाणाऱ्या, मांसाहार करणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. अनेकांनी बोकडाच्या मटणाची तहान पोल्ट्रीतील कोंबड्यांवर भागवली; पण बोकडाचे मटण ते बोकडाचे मटण. पोल्ट्रीतील कोंबड्यांच्या मटणाला त्याची सर येत नाही. त्यामुळे अस्सल खवैय्यांची तडफड होत आहे. त्यामुळेच अनेक गावांत गुपचुप बोकड, बकरी कापण्याचे प्रकार होऊ लागले. पोलिसांना कळू नये, जास्त बोभाटा होऊ नये म्हणून रात्री, पहाटे बोकड कापून आपापसात वाटून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. सातारा तालुक्‍यातील एका गावातही काही आठ-दहा मंडळींनी असा गुपचुप बोकड कापण्याचा प्लॅन केला. पण... पण गावातील कोणीतरी याबाबतची "पीन' पोलिसांना मारली. 

ही आठ ते दहा खवैय्यांची टोळी शिवारात लांब एका ठिकाणी बोकड घेऊन गेले. खवैय्यांनी बरोबर सुरीही पाजळून आणली होती. बोकड कापणार तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला अन्‌ साऱ्या खवैय्यांची पळताभुई थोडी झाली. पोलिसांना सापडू नये म्हणून जो तो अंधारात पळत सुटला. कोणी पडले, बांधावरून धडपडले पण मागे वळूनही कोणी पाहिले नाही. तेथे पोचलेल्या पोलिसांनाही काही सापडले नाही. अंधारत खवैय्यांच्या पळापळीने भेदरलेले बोकडही अंधारात पळून गेले होते. 


दुसऱ्या दिवशी अखेर सापडला बोकड 

दरम्यान, दुसरे दिवशी "तो' बोकड ओढ्याच्या काठी चरताना सापडला. पोलिसांच्या सायरनने खरे तर त्या बोकडाचा जीव वाचला. मात्र, हे त्याच्या गावीही नव्हते. गावात खवैय्यांची मात्र, चरफड सुरू होती. 

फक्त एका फाेनवर ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना मिळणार घरपोच पेन्शन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे जळगावला रेड अलर्ट

Muslim Polygamy Case : मुस्लिम पुरुषांच्या बहुपत्नीत्वाला याचिकेद्वारे आव्हान, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : कोयना-वारणा धरणांच्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा-वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली

Russia-Ukraine Conflict : इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना मध्येच युक्रेन-रशियाचं काय बिनसलं?

R. Ashwin: वैभव सूर्यवंशीला डच्चू, भुवनेश्वर कुमारला संधी; 2027 वर्ल्ड कपसाठी आर. अश्विनचा संभाव्य भारतीय संघ चर्चेत

SCROLL FOR NEXT