पश्चिम महाराष्ट्र

सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच 

सकाळवृत्तसेवा

उंब्रज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून भाजपने पुढे केलेला युतीचा हात स्वीकारला आहे. त्यामुळे चांगले चालू आहे, अशावेळी विनाकारण कोणीही संभ्रम निर्माण करून युतीच्या केशरी दुधात मिठाचा खडा टाकू नये. सातारा लोकसभा मतदारसंघ यापूर्वीही शिवसेनेचाच होता आणि यावेळीही शिवसेनेकडेच राहील, असा दावा शिवसेनेचे संपर्कप्रमुख व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. 

या वेळी कऱ्हाड उत्तरचे तालुकाप्रमुख सुनील पाटील, उपतालुकाप्रमुख संजय भोसले उपस्थित होते. सातारा लोकसभेबरोबरच जिल्ह्यातील विधानसभेचे जे मतदारसंघ पूर्वीपासून जिल्हाभर भगवा सप्ताह व सभासद नोंदणी सुरू आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. युतीला चांगले वातावरण आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल कोणतीही शंका नाही, असे नमूद करून प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ""जे मतदारसंघ पूर्वापार भाजपचे असतील, तेथे शिवसेना खांद्याला खांदा लावून लढेल. जे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत, तेथे भाजपने आमच्या खांद्याला खांदा लावून लढावे. सध्या युतीत सर्व काही चांगले चालले आहे. जिल्ह्यातील जे विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेकडे आहेत, ते आमच्याकडेच राहतील. निवडणुकीच्या तोंडावर "आयाराम गयाराम' यांना पक्षात स्थान नसून जे निष्ठावंत आहेत, अशांना प्राधान्याने संधी दिली जाईल. ज्यांना पक्षाची ध्येयधोरणे मंजूर आहेत व विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्यालाच उमेदवारी दिली जाईल. सध्याची युती समान संधी या तत्त्वावर झाली असून जे पारंपरिक मतदारसंघ हे ज्याचे-त्याचे असतील. मतदारसंघ अदलाबदलीची अथवा सोडण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. वरिष्ठ पातळीवर जे जागा वाटप झाले, त्यानुसार एखादा वाढीव मतदारसंघ शिवसेनेला मिळू शकतो. त्यामुळे मतदारसंघ सोडण्याचा किंवा बदलण्याचा प्रश्नच येत नाही. कऱ्हाड उत्तर विधानसभा शिवसेनेकडे होता व तो आमच्याकडेच राहील.'' 

जलसिंचन योजनांच्या कामांना गती 
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. 2013 पासून बंद असणारी इंदोली व पाल उपसा जलसिंचन योजनेतून हजारो हेक्‍टर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले. लवकरच या योजनेचे 50 मीटरऐवजी 100 मीटर हेड करून अधिकाधिक भाग पाण्याखाली आणू. हे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल. धनगरवाडी-हणबरवाडी योजना गतीने होण्यासाठी भरघोस निधीची तरतूद केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT