पश्चिम महाराष्ट्र

‘हल्लाबोल’साठी साताऱ्यातून ‘काँग्रेसी फौज’

सकाळवृत्तसेवा

सातारा - नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या (मंगळवारी) हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातून दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची फौज रवाना झाली आहे. काँग्रेसचे दोनशे कार्यकर्ते, तर राष्ट्रवादीचे सातशे कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले आहेत. 

राज्यातील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या सरकारने गेल्या तीन वर्षांत घेतलेल्या शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधी भूमिकेमुळे सर्व जण मेटाकुटीला आले आहेत. या सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी व शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी सरकारच्या विरोधात हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते नागपूर अधिवेशनाकडे जाऊ लागले आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येने सर्व जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होऊ लागले आहेत. उद्या (मंगळवारी) दोन्ही काँग्रेसचा हा हल्लाबोल मोर्चा नागपूर येथील अधिवेशनावर धडकणार आहे. त्यासाठी साताऱ्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते रवाना झाले आहेत. काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोनशे कार्यकर्ते रवाना झाले आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्‍यातून काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. त्यासाठी दोन बस व दहा कार या कार्यकर्त्यांना घेऊन नागपूरमध्ये पोचल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराने आपापले कार्यकर्ते पाठविले आहेत, तसेच युवक, महिला आघाडीही आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाली आहे. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेल्वेने, तर युवक आणि विद्यार्थी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते लक्‍झरी बसने रवाना झाले आहेत. त्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीचे सुमारे सातशे कार्यकर्ते नागपूरच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. स्थानिक आमदार हे अधिवेशनाच्या बाहेरच आंदोलनात सहभागी आहेत. त्यामुळे नागपूरच्या हल्लाबोल मोर्चात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची फौज दिसणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT