पश्चिम महाराष्ट्र

आणखी एका टोळीला "मोका' 

सकाळवृत्तसेवा

सातारा - जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत दरोडे, जबरी चोरी, बलात्कार, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या फलटण व खंडाळा तालुक्‍यांतील टोळीतील तिघांवर "मोका' कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलिसांनी "मोका'अंतर्गत केलेली ही आठवी कारवाई आहे. त्याचा गुन्हेगारांना चांगलाच धसका बसला आहे. 

चंद्रकांत  ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (मूळ रा. ढवळ, ता. फलटण, सध्या, शिर्के पेपर मिलजवळ शिरवळ), नीलेश बाळासो निकाळजे (रा. सोनगाव, ता. फलटण) व अक्षय शिवाजी खताळ (रा. बिबी, ता. फलटण) अशी त्यांची नावे आहेत. 27 एप्रिल 2017 रोजी शिरवळ परिसरातील केदारेश्‍वर मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले होते. या प्रकरणी या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्‌माकर घनवट यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अटक केली होती. 

या गुन्ह्याच्या तपासामध्ये वरील तिघांच्या टोळीवर शिरवळ, लोणंद, फलटण ग्रामीण, खंडाळा, सातारा शहर, तालुका, कळंबोली, पनवेल (जि. रायगड) या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. या टोळीने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधितांवर "मोका' कायद्यानुसार कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिरवळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. एन. पाटील यांना दिल्या होत्या. निरीक्षक पाटील व घनवट यांनी याबाबतचा प्रस्ताव अधीक्षक पाटील व अतिरिक्त अधीक्षक विजय पवार यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांना दिला होता. त्याला त्यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार संबंधित गुन्ह्यामध्ये "मोका'चे कलम वाढविण्यात आले आहे. फलटणचे पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे तपास करत आहेत. या टोळीविरुद्ध काही तक्रारी असल्यास संबंधित पोलिस ठाण्यात नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT