कराड
कराड 
पश्चिम महाराष्ट्र

'लाभार्थी' नसलेल्यांनाही मिळणार 'या' तलावांचे पाणी

सकाळवृत्तसेवा

काले (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : कऱ्हाडच्या दक्षिण भागात येवती व म्हासोली तलावातून येणारे पाणी लाभार्थी क्षेत्रासह लाभार्थी नसलेल्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे भागातील अनेक पिढ्यांपासून पाण्याचा होणारा त्रास कायमचा संपणार आहे, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी येथे दिली. पाणी शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. त्याचे शेतकरीच मालक आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ओंड येथे येवती म्हासोली तलावातून बंधीस्त पाईप लाईनव्दारे ओंड, ओंडोशी गावांना पाणी पुरवठा प्रकल्प प्रात्यक्षिकासाठी पाणी परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्रकल्प अधिकारी रेड्डीयार, आर.एम. धोत्रे, ए.पी. शिंदे, एस.एम. पाटील, सुर्यवंशी उपस्थित होते. डॉ. पाटणकर यांच्या हस्ते पाणी पुजण्यात आले. यावेळी सरपंच बी. टी. थोरात, आनंदराव थोरात, प्रकाश थोरात, भाऊसाहेब थोरात, प्रकाश शिंदे, बाजीराव थोरात, मोहनराव थोरात यांच्यासह ओंड, ओंडोशी व परीसरातील वाड्या वस्तीवरील शेतकरी उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, येवती म्हासोली धरणातून साडे बारा किलोमीटर बंदीस्त पाईप द्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. या पाण्यामुळे या विभागातील सुमारे एक हजार ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. लाभार्थी क्षेत्र धारकांना शेतीसाठी पाणी मिळणारच आहे पण त्या लाभार्थी क्षेत्रापासून लगतच्या शेतीलाही याचा लाभ होणार आहे. शेवटच्या पाणी लाभ धारकाला पाणी प्रथम या तत्वाद्वारे पाणी पुरवठा केला जाईल. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या पाण्याने तुमच्या राहणीमान व शेती समृध्दीसाठी उपयुक्त होणार आहे. पुर्वी तुम्हाला प्रकल्प होताना कधी कुणी विचारले नाही पण आज तुम्हाला तुमच्या हक्काचे पाणी देण्यासाठी विचारले जात आहे. तुमच्या सुचनेनुसार हा प्रकल्प यशस्वी करावयाचा आहे. अनेक पिढ्यापासून ज्या शेतात फक्त खरीप पिके कशी तरी मिळत होती ते चित्र यामुळे बदलणार आहे.

वर्षातील आठ महिने तुम्हाला तुमच्या हक्काचे पाणी मिळणार आहे. कारण या पाण्यावर हक्त तुमचा आहे. त्याचा वापर व योग्य व्यवस्थापन तुम्हाला करावयाचे आहे. व यातून जलक्रांतीचे बीज तुम्हीच रोवणार आहे. यासाठी सर्वांच्या विचाराने प्रकल्प यशस्वी करण्यासाठी एकी दाखवा. यावेळी रेड्डीयार यांनी स्लाईड शो द्वारे या प्रकल्पाचे सादरीकरण केले. शेतकऱ्यांच्या विवीध प्रश्नावर डॉ. पाटणकर व अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. पी. वाय. जाधव यांनी पॉवर पॉईंट क्लीप तयार केली. रावसाहेब शिंदे यांनी ठराव वाचले. सुनिल शिंदे यांनी प्रास्तावीक केले. प्राचार्य व्ही.टी. थोरात यांनी सुत्रसंचलन केले. बी.टी. थोरात यांनी आभार मानले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT