satara  sakal
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर कराडला मुस्लिम समाजाची पोलिसांसमवेत बैठक; संशयीतावर कारवाईची मागणी

एक जण ठार झाला त्यामुळे सातारा जिल्ह्यातील वातावरण तंणावपुर्ण बनले होते

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कराड: पुसेसावळी येथे दोन गटातील धुमश्यक्रीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर आज कराड (जिल्हा सातारा) येथे मुस्लिम समाजाची बैठक अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने संबंधित संशययीतावर कडक कारवाई करून संबंधितांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समाजाच्या वतीने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता समाजाच्या वतीने घेतली जाईल असे आश्वासन पोलिसांना देण्यात आले.

पुसेसावळी येथील दोन गटात जोरदार धुमचक्री झाली. त्यातील एक जण ठार झाला. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील वातावरण तंणावपुर्ण बनले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैना करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील व कराड शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज मगळवारी पोलीस दलाच्यावतीने मुस्लिम समाजाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये समाजाच्या वतीने संबंधित संशयीतावर कठोर कारवाई करावी व त्यांना अटक करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी संबंधितावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू असून कोणा संशयितला त्यातून सोडले जाणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी समाजाच्या वतीने सर्वांना शांततेचे आवाहन केले असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असे आश्वासन मुस्लिम समाजाच्यावतीने पोलीस अधिकाऱ्यांना उपस्थितानी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT