Maratha community warned government 
पश्चिम महाराष्ट्र

आता देताय की जाताय; मराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ

विशाल पाटील

सातारा : मुंबई येथील ऐतिहासिक मराठा क्रांती मूक महामोर्चाला महिना लोटला तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. आता आम्हीही थांबणार नाही, मराठ्यांच्या मागण्या मान्य करा, असे सांगत जिल्ह्यातील मराठा समाजाने आज साताऱ्यात सरकारचा गोंधळ घातला. मराठ्यांची ताकद काय आहे, ते पुन्हा दाखविण्यासाठी मराठ्यांची राजधानी राहिलेल्या साताऱ्यातून पुन्हा एकदा क्रांतीची ज्वाला भडकवत "आता देताय का जाताय' असा इशाराच सरकारला दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनाबाबत आजपर्यंत शासकीय यंत्रणेने कोणतेही निर्णायक पाऊल टाकलेले नाही. शासनाने केवळ मागण्या मान्य केल्याचे दाखवत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. मुंबई येथील महामोर्चाला एक महिना पूर्ण झाला. तब्बल 58 मोर्चे काढले तरीही मागण्यांनुसार दिलेल्या आश्‍वासनाबाबत कोणताही शासन निर्णय अमलात आणला नाही. मराठा समाजात शासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा मराठ्यांनी पेटून उठत आता थांबायचे नाही, असे ठरविले. त्याची ज्वाला साताऱ्यातून पेटविली असून, येथील गांधी मैदान येथे सायंकाळी सात वाजता शासनाचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने जागरण व गोंधळ घालत अनोखे आंदोलन केले. 

बहिरे, आंधळे झालेल्या, सुस्त पडलेल्या राज्य सरकारला, देशाटन करण्यात गुंतलेल्या मोदी सरकारला जाग आणण्यासाठी हा जागरण, गोंधळ घालण्यात आला. महाविद्यालयीन युवकांनी गोंधळावेळी दिवट्या नाचविल्या. युवतींनी गोंधळ गीतावर नृत्य सादर करून मराठा समाजाचा रूद्रावतार दाखवून दिला. जिल्ह्यातील शेकडो मराठा समाज बांधव, युवक युवती यात सहभागी होत्या. या गोंधळ कार्यक्रमाने गांधी मैदानासह पुन्हा एकदा साताऱ्यातील वातावरण मराठामय झाले. 

फक्‍त आणि फक्‍त मराठा 
या कार्यक्रमास जिल्हाभरातील मराठा बांधव, भगिणी उपस्थितीत होत्या. संयोजकांनी सर्वांना खाली बसण्याची सूचना देताच सर्वच जण खाली बसले. मग, नगराध्यक्षा, जिल्हा परिषद सदस्या, नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य असो की उद्योजक, व्यवसायिक, नोकरदार सर्वजण सर्वसामान्य मराठ्यांप्रमाणे मांडीला मांडी लावून बसले. दरम्यान, प्रारंभी हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

या सरकारला धक्‍का 
या प्रसंगी "एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय, क्रांतीची ज्वाला भडकणार मराठा आता उजळणार, नुसती नको पोकळ चर्चा, आधी राडा मगच मोर्चा, मराठा शक्‍तीचे विराट दर्शन झुकेल नाही तर तुटेल सरकार, मराठ्यांचा इरादा पक्‍का या सरकारला धक्‍का, नको आता आश्‍वासनं पहिलं द्या आरक्षण, आता देताय का जाताय,' अशा घोषणांनी गांधी मैदान दणाणून सोडले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा; ८५०० कोटींची देणार भेट, यंत्रणा तैनात पण अधिकृत घोषणा नाही

Mumbai: ७५ प्रवासी असणाऱ्या विमानाचं चाक हवेतच निखळलं अन्...; मुंबई विमानतळावर धक्कादायक घटना

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

दुर्दैवी ! बिल्डिंगवरून पडल्याने 37 वर्षीय अभिनेत्याने गमावला जीव

Latest Marathi News Updates Live : साडेतीनशे एकर जागेवरील कांदळवन केले नष्ट

SCROLL FOR NEXT