पश्चिम महाराष्ट्र

इमारतीचे पार्किंग खचून ओढ्यात ढासळले 

सकाळवृत्तसेवा

सातारा - रामाचा गोट येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधील जमीन भरावासह ओढ्यात ढासळून झालेल्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिस तसेच पालिका अधिकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

रामाचा गोट येथील भटजीमहाराज मठालगत दीपलक्ष्मी कॉम्प्लेक्‍स आहे. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज करत पार्किंगमधील ओढ्या लगतचा भाग कोसळला. या आवाजाने अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काहींना वाटले भूकंप झाला. लोक आवाजाच्या दिशेने पार्किंगमध्ये धावत आले. त्या वेळी पार्किंगमधील सुमारे 100 फूट लांबीचा, ओढ्यालगतचा भाग संरक्षक भिंतीसह ओढ्यात कोसळला होता. पार्किंगमध्ये, जमिनीखाली स्वच्छतागृहाच्या दोन बांधीव टाक्‍या होत्या. तसेच कोसळलेल्या भागात एक दुचाकी उभी होती. ही गाडीही खचलेल्या भागासह सुमारे 25 फूट खोल ओढ्यात गेली. एका कुटुंबाने पाण्याची टाकी पार्किंगमध्ये पुरली होती. या टाकीचेही नुकसान झाले. पाण्याचे नळ व स्वच्छतागृहाच्या पाइपची मोडतोड झाली. 

या दुर्घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रात्री उशिरापर्यंत अपार्टमेंटमध्ये गोंधळ सुरू होता. पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी भाग निरीक्षकांसह पाहणी केली. पोलिसही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. जमिनीचा भराव खचल्यामुळे ही दुर्घटना झाली असली, तरी इमारतीचे "पिलर' सुरक्षित असल्याने इमारतीस कोणताही धोका नाही, असे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले. 2008 मध्ये या अपार्टमेंटचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 

ओढ्याच्या बाजूची भिंत असल्याने ती पाण्यामुळे ढासळली असावी. बिल्डरला भिंत बांधून घेण्याच्या सूचना व ओढ्याचा प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे पालिकेच्या शहर विकास विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT