Satara 
पश्चिम महाराष्ट्र

सातारा : दराअभावी कांदा ऐरणीत लॉकडाउन!

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि तो रोखण्यासाठी सुरू असलेल्या "लॉकडाउन'मुळे बाजारापेठांवर विविध अंगाने परिणाम झाला असल्यामुळे कांद्याला दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. परिणाम शेतकऱ्यांनी कांदा ऐरणीत लॉकडाउन करण्याचा सपाटा लावल्याचे दिसत आहे. 

सध्या संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने हैराण केलेले आहे. भारतातही हा विषाणू मोठ्या प्रमाणात पाय वेगाने पसरू लागलेला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाउन सुरू असल्यामुळे खासगी वाहतूक, बाजारपेठांतील कामकाज विस्कळीत असल्यामुळे शेतीमालाला मोठा फटका बसतो आहे. दुष्काळी परिस्थितीतून सावरून यंदा माण तालुक्‍यातील दहिवडी, वावरहिरे, बिदाल, राणंद, बिजवडी, शिंगणापूर परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. या भागात कांदा काढणीस सुरवात झाली. परंतु, बाजारात "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर कांद्याला दर नसल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीमध्ये सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा सर्रास ऐरणीमध्ये लॉकडाउन झाल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे. 

बाजारपेठांवर सध्या सर्वत्र बंधने घालण्यात आल्यामुळे बाजारात कांद्याला ग्राहक मिळत नाही. त्यामुळे कांद्याचे बाजार आणखी कमी होत चालले आहेत. गतवर्षी दहा ते 15 हजार प्रति क्विंटल कांद्याची विक्री झाली. परिणामी यावर्षी कांद्याच्या दराची मोठ्या प्रमाणात घसरण होऊन 600 ते 800 रुपये प्रति क्विंटल दराने बाजारभाव सुरू आहेत. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्‍किल होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी कांदा साठवून ठेवण्यास प्राधान्य देत आहेत. तापमान बदलामुळे पोषक वातावरण न मिळाल्यास कांद्याचे मोठे नुकसान होते. नुकसान टाळण्यासाठी शास्त्रोक्त पध्दतीने साठवण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी ऐरणी उभारून कांदा साठवण करण्यास सुरवात केली आहे. यामुळे कांदा साठवण केल्याने कांद्याला बाजारभाव वाढल्यानंतर कांदा विक्रीस आणून काही प्रमाणात फायदा मिळणे शक्‍य असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले. 


""उन्हाळी कांद्याला म्हणावा तसा दर मिळत नाही. तरीही शेतकऱ्यांचा खर्च जावून थोडेफार तरी पैसे शिल्लक राहतात. पण, यावेळी लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद झाल्या. त्यामुळे दर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कवडीमोल दराने कांदा देण्यापेक्षा शेतकऱ्यांनी तो ऐरणीत साठवण्याचा निर्णय घेतला आहे.'' 
-अनिल अवघडे, वावरहिरे, ता. माण 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

Wai Bhuinj Police Action: भुईंज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरणारी ‘पिकअप गँग’ जेरबंद, सहा जनावरांच्या चोरीची कबुली

SCROLL FOR NEXT