पश्चिम महाराष्ट्र

महत्वाची बातमी : सातारा जिल्ह्यातील 'या' गावांत केवळ वैद्यकीय सुविधाच सुरु राहणार

सकाळ वृत्तसेवा

कराड : कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. सातारा जिल्हयात सध्यस्थितीत कोरोनाबाधित  रुग्णांपैकी 8 रुग्ण हे कराड तालुक्यातील असल्याने कराड शहर व नजीकचे नगरपरिषद व शहरानजीकच्या विविध ग्रामपंचायते क्षेत्र हे प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्याकरीता उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर कराड यांनी प्रस्तावित केले आहे.

या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराड तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने कराड तालुक्यातील संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतींचे क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी  क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार पुढीलप्रमाणे 23 एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
 
याप्रमाणे सातारा जिल्हयातील कराड तालुक्यातील संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस 2 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस सक्त मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात दवाखाने, हॉस्पीटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.  फक्त अत्यावश्यक सेवेतील औषधे घरपोच पुरविण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर कराड ज्याप्रमाणे यंत्रणा उभारतील, त्याप्रमाणे औषधे घरपोच पुरविण्यात येतील.  या प्रतिबंधीत क्षेत्रातील पोलीस विभागाचा पेट्रोलपंप वगळून इतर सर्व पेट्रोल पंप बंद राहतील. या पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त केले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनांना इंधनपुरवठा करण्यात यावा. निकडीच्या प्रसंगी रुग्ण असल्याची खातरजमा करुनच रुग्णाची वाहतूक करणा-या वाहनांसाठीच मर्यादीत स्वरुपात इंधन पुरवठा करणेत यावा. या आदेशामधून अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय, निम शासकीय, खाजगी अधिकारी  कर्मचारी वगळणेत येत आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची आरोग्य विषयक माहिती संकलित करणेकामी नियुक्त करणेत आलेल्या कर्मचाऱ्यांना चूकीची माहिती देणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशी चूकीची माहिती देणा-या विरुध्द कठोर कारवाई करणेची तरतूद आहे. त्यामुळे विचारलेली माहिती न लपविता पूर्णपणे तसेच अचूकरित्या नागरिकांनी द्यावी. व नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे.

यापुर्वी वेगवेगळया विभागामार्फत देण्यात आलेले सर्व पास रदद करण्यात आले आहेत. यापूर्वी नियुक्त केले अधिकारी, कर्मचारी यांचेपैकी अत्यावश्यक असलेले अधिकारी- कर्मचारी यांनाच उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सीडंट कमांडंर कराड यांनी स्वतंत्र नव्याने ओळखपत्र तसेच वाहन परवाना वितरीत करावा. वितरीत करण्यात येणाऱ्या ओळखपत्र तसेच वाहन परवान्यावर क्रमांक,दिनांक, वेळ व कार्यक्षेत्र  यांचे वैधतेसह आवश्यक असणारा सर्व तपशिल नमूद करावा.  पोलीस विभागाने त्यांचेशी निगडीत बाबींच्या अनुषंगाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

BigBreaking : तीन वर्षाच्या मुलास कोरोना तर पाच महिन्याच्या बाळाचा मृत्यू

हाय अलर्ट...बंदाेबस्त...प्रेम...हॅव्ह अ ब्रेक हॅव्ह अ किटकॅट

कोरोनाची संभाव्य साखळी टाळण्यासाठी कऱ्हाडकरांवर आली ही जबाबदारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार वाढीसह उघडला; निफ्टी 80 अंकांनी वधारला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेणार? BCCI ने स्पष्ट केली भूमिका; ही त्यांची शेवटची मालिका...

Zilla Parishad Politics : जिल्हा परिषदेसाठी कायपण! ‘सरकार’, ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार ‘कुणबी’; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले

Missing Lawyer Case : तीन महिन्यांपासून वकील बेपत्ता, शिंदे गटाच्या 'या' आमदारावर गंभीर आरोप; किशोरी आरडे म्हणाल्या, 'माझ्या पतीच्या जीवाला..'

Latest Marathi News Live Update : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणासंदर्भात एसआयटी/सीआयडीने अटक केलेल्या श्यामकानु महंता, सिद्धार्थ शर्मा आणि इतरांना आज न्यायालयात हजर करणार

SCROLL FOR NEXT