पश्चिम महाराष्ट्र

बिलीमाेरीया हायस्कूलला माेठी आग; पाचगणी,महाबळेश्वर, वाईतील अग्नीशमक दल दाखल

सकाळ वृत्तसेवा

भिलार- सातारा ः पाचगणी येथील बिलिमोरिया हायस्कूल या इंग्रजी माध्यम हायस्कूलच्या एका इमारतीस आज (मंगळवार) सकाळी दहा वाजता आग लागली. या आगीत शाळेच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान शाळेला सुटी असल्याने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही. शाळेच्या इमारतीचा पहिला मजल्यावर संगणक लॅब आणि आर्ट रुन आहे. या ठिकाणी ही आग लागली. पाचगणीसह विविध पालिकांचे अग्निशामक बंब यासह स्थानिक नागरीकांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

कोरोनाव्हायरसच्या प्रादुभावामुळे सध्या महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन आहे. त्या पार्श्वभूमीवर पाचगणीतीलही सर्व शाळा बंद आहेत. आज (सोमवार) सकाळी बिलिमोरिया हायस्कूल या इंग्रजी माध्यम हायस्कूलला आग लागल्याची घटना घडली. शाळा बंद असल्याने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासह, फर्निचर, कपडे जळून खाक झाले. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावर पाचगणी नगरपालिकेचे अग्निशामक बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. 

साताऱ्यात लॉकडाऊन जैसे थे: कारखानदार, बांधकम व्यावसायिकांसह मटण, चिकन, मासे विक्रेत्यांना दिलासा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT