पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यावर रिव्हॉल्व्हर रोखणाऱ्याच्या घरात सापडली 16 जिवंत काडतुसे; संशयित फरार

सकाळ वृत्तसेवा

पाटण ः मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचा निलंबित अवर सचिव भरत आत्माराम पाटील याने तालुक्‍यातील दिवशी बुद्रुक येथील पांडुरंग विठ्ठल सूर्यवंशी यांना पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यावर संशयित भरत पाटील याचा तपास सुरू असताना मारुल हवेली (ता. पाटण) येथील त्याच्या निवासस्थानी पोलिसांना 42 मि. मि. रिव्हॉल्व्हरची 16 काडतुसे सापडली. ती जप्त केली आहेत. पाटील अद्यापही फरारी असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली. 
 
पोलिसांची माहिती अशी ः भरत पाटील याच्यासह अन्य तिघांनी दिवशी बुद्रुक येथील शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडविला होता. त्याबाबत विचारणा केली असता पांडुरंग सूर्यवंशी यांना मारहाण करून त्यांच्या डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भरत पाटीलसह अन्य तिघांपैकी एक अनोळखी अशा चार जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी यातील जितेंद्र सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाकडून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर याच गुन्ह्यातील एक अल्पवयीन मुलालाही चौकशीस ताब्यात घेतले होते. भरत पाटील व अन्य अनोळखी व्यक्ती फरारी आहेत. याबाबत मंगळवारी रात्री सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्या पथकाने मारूल हवेली येथील पाटील याच्या बहिणीच्या घराशेजारीच बांधलेल्या घरात धाड टाकली.

यामध्ये भरत पाटील सापडला नाही, मात्र तेथे तपासणी केली असता 42 मिलिमीटरच्या रिव्हॉल्व्हरची 16 काडतुसे सापडली. पोलिसांनी ती जप्त केली. भरत पाटील मंत्रालयात ग्रामविकास विभागात अवर सचिव म्हणून कार्यरत होता. त्याची चौकशी सुरू असल्याने 2017- 18 पासून तो निलंबित आहे. दरम्यानच्या काळात यापूर्वी पाटण पोलिसात भरत पाटील याच्याविरुद्ध अशा प्रकारे मारहाण, हवेत गोळीबार आदी तक्रारी दाखल आहेत. मात्र आजवर त्याच्यावर कोणतीही गंभीर कारवाई झाली नव्हती.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अतिरिक्त सचिवाने शेतकऱ्यावर राेखली रिव्हॉल्व्हर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Crime: बनावट क्यूआर कोड अन् फर्म...; बनावट औषधांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश, 'इतका' मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षण जनजागृती रथाचे फुलंब्रीत उत्साहात स्वागत

SCROLL FOR NEXT