पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजेंच्या माजी नगरसेवकाच्या मुलावर अपहरणचा गुन्हा नाेंद

सकाळवृत्तसेवा

सातारा : फलक फाडल्याच्या कारणावरून युवकाचे अपहरण करून त्यास मारहाण केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटातील माजी नगरसेवक दिलीप गवळी यांच्या चिरंजीवासह अन्य सहा जणांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तेजस सुनील पवार (मूळ रा. लावंघर, सध्या रा. शिवराज पेट्रोल पंप परिसर) यांनी फिर्याद दिली आहे.

शहर परिसरात उभारलेला फलक फाडल्याच्या संशयावरून शनिवारी (ता.25) शहरातील काही युवकांनी दोन युवकांना मारहाण करत त्यांना आपल्या ताब्यात ठेवले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी बोगदा परिसरात कारवाई करत दोघांची सुटका केली. संशयितांनी केलेल्या मारहाणीत गणेश नवसरे हा युवक जखमी झाला होता. मारहाण झालेल्या दोन्ही युवकांना त्यांना अलिशान गाडीतून कोणत्या युवकांनी, कशासाठी नेले होते अशी चौकशी पोलिसांनी केली. दरम्यान या गंभीर प्रकाराची माहिती घेण्यासाठी दस्तुरखूद्द पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही शहर पोलिस ठाण्यात तळ ठोकला होता. चौकशी अंतीगौरव दिलीप गवळी, विशाल अनिल वायदंडे, बबलू बाबूराव पवार त्यांच्यासह तीन ते चार साथीदारांवर (सर्व रा. सातारा शहर परिसर) अपहरण करुन मारहाण करणे हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तेजस सुनील पवार (मूळ रा. लावंघर, सध्या रा. शिवराज पेट्रोल पंप परिसर) यांनी फिर्याद दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT