पश्चिम महाराष्ट्र

BigBreaking : पाच महिन्याच्या बाळाचा मृत्यू तर तीन वर्षाच्या मुलास कोरोना

सकाळ वृत्तसेवा

सातारा  : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित तीन वर्षीय मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा मुलगा कोरोना बाधित असलयाची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्याची काेराेना बाधित रुग्णांची आज संख्या 18 इतकी झाली आहे.

याबराेबरच विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला घशातील स्त्रावाचा नमुना पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस त्याच्यावर उपचार व पुर्नतपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. गडीकर यांनी दिली.
आता सातारा जिल्ह्यात 13 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत तीन (कोविड19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर दाेघांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे एक , बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आलेले दाेन व सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित नऊ तर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे चार, सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 24 व उपजिल्हा जिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाचा निकट सहवासित एक अशा एकूण 41 जणांना अनुमानित म्हणून आज (बुधवार) विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  

या 41  अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, कृष्णा मेडिकेल कॉलेज, कराड येथील अनुमानित रुग्णांमध्ये पाच महिन्याच्या पुरुष जातीच्या बाळाचा समावेश असून त्याचा मृत्यु झाला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

अटकेपुर्वीच वाधवानांच्या सुटकेचे रंगलय राजकारण

अवैध दारू वाहतूकप्रकरणी सचिन बेलागडेस अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजितदादा पंचतत्वात विलीन; पुत्र पार्थ आणि जय यांनी दिला मुखाग्नी

Ajit Pawar Funeral News Updates : अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पूर्ण, अश्रूंनी व जड अंतःकरणाने अखेरचा निरोप

Latest Marathi News Live Update : केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभामध्ये आर्थिक सर्वेक्षण 2025–26 सादर केले

T20 World Cup: संजू सॅमसन OUT, इशान किशन IN! वर्ल्ड कपमध्ये उतरणारी भारताची तगडी Playing XI

त्याच्या लघवीतून रक्त आलं... १२ तासात पालटलं इमरान हाश्मीचं विश्व; मुलाच्या आजाराबद्दल पहिल्यांदाच बोलला अभिनेता

SCROLL FOR NEXT