पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : साताऱ्यात दाेन कोरोना संशयितांचा मृत्यू; ज्येष्ठ महिला, युवकाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 4 नागरिकांना बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून तर 2 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे व प्रवास करुन आलेले 2 नागरिक आणि 1 आरोग्य कर्मचारी असे एकूण 9 जणांना तर कृष्णा मेडिकल, कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून 22 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 7 नागरिकांना तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 4 असे एकूण 42 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

यापैकी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 70 वर्षीय महिला व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 32 वर्षीय पुरुष या दोघांचा मृत्यु  श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे झाला आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने संशयित म्हणून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित 40 नागरिकांच्या  घशातील स्त्रावांचे नमुनेही   बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 
 

दरम्यान कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 3 असे एकूण 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

मोफत तांदळाचा भात शिजतोय कुठं ?

दारुबिरु सब कुछ झूठ रे बाबा; टेक केअर

क्षणात काॅन्स्टेबलच्या डोळ्यासमोरून स्वजीवनाचा फ्लॅशबॅक सरकला 

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा 10 नागरिकांना बाधित रुग्णाचे सहवासित म्हणून 14 दिवसानंतरच्या पुनर्तपासणी करीता विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड व फलटण येथे प्रत्येकी 1 नागरिक अशा एकूण 12 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही  डॉ.  गडीकर यांनी दिली आहे. 

दिनांक 20.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी

  •   क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा    406
  •   कृष्णा हॉस्पीटल, कराड-    305
  •  एकूण दाखल -    711
  •     प्रवासी-124, निकट सहवासीत-441, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-146 = एकूण 711
  •  14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-    10
  •    कोरोना नमुने घेतलेले एकूण-    721
  •     कोरोना बाधित अहवाल -    14
  •     कोरोना अबाधित अहवाल -    630
  •    अहवाल प्रलंबित -    67
  •     डिस्चार्ज दिलेले-    633
  • .    मृत्यू    2
  •    सद्यस्थितीत दाखल-    76
  •    आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 19.4.2020) -    1079
  •    होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -    1079
  •    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -    682
  •    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –    397
  •    संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-    185
  •    आज दाखल    12
  •    यापैकी डिस्जार्ज केलेले-    102
  •   यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-    0
  •    अद्याप दाखल -    83

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT