पश्चिम महाराष्ट्र

Video : कऱ्हाड पाेलिसांचा फंडा छत्री वापरा आणि काेराेनाला पळवा

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथीलतेमुळे शहरातील रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. त्याचा विचार करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी सोशल डिस्टन्सींग पाळावे यासाठी पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत कऱ्हाड शहरातुन छाता रॅली काढत छत्री वापरा, डीस्टन्सींग पाळा हा संदेश देवुन जनजागृती केली.

कोरोना बाधीतांची संख्या वाढल्याने मध्यंतरी शहरासह मलकापूर व परिसरातील ११ गावात पुर्णतः १०० टक्के लॉककडाऊन जारी केले होते. त्यामुळे शहर व तालुक्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर फिरणारांना प्रारंभी काठीने प्रसाद दिला. त्यानंतर वाहनजप्त करून कारवाईही केली. तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी करून शहरात येणार्‍यांना रोखले. शहरातील सर्व रस्ते बॅरिकेस्टसनी बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये घरी रहा, सुरक्षित रहा, असे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. परंतु काही लोकांच्या चुकीमुळे कराड शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. तर तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तो शंभराच्या जवळपास पोचली आहे. त्याचा विचार करुन कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी व त्याला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग विविध उपाययोजना करत आहेत.

त्याअंतर्गतच आज पोलिस उपाधिक्षक गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील यांच्या संकल्पनेतुन आझ पोलिसांनी छत्री वापरा डिस्टन्स पाळा असा संदेश देत शहरातून जनजागृती रॅली काढली. ही रॅली दत्त चौकातून मुख्य रस्त्याने बाजारपेठ मार्गाने ही चावडी चौक, कृष्णा नाका व पुन्हा शहर पोलिस ठाण्याजवळ आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.

या दरम्यान पोलिसांनी हातात छत्री घेऊन नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले. या अनोख्या पद्धतीने पोलिसांनी केलेल्या जनजागृतीची शहरात चांगलीच चर्चा झाली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

Yashasvi Jaiswal Hospitalized : यशस्वी जैस्वालची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात तातडीने करावं लागलं भरती; कशी आहे प्रकृती?

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

SCROLL FOR NEXT