पश्चिम महाराष्ट्र

Video : जाणून घ्या स्मशानभूमीतील भाताच्या गोळ्यांचे रहस्य

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा)  : कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे प्रत्येकजण वैतागला आहे. परंतु वाघमोडेवाडी (ता.माण) प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रवीण जोशी हे मात्र पक्षांसाठी आपल्या मूळ गावी गुळुंचे (ता.पुरंदर) येथील डोंगराळ भागात अन्न-पाण्याची सोय करण्यासाठी वणवण करत आहेत. स्मशानभूमीत देखील भाताचे गोळे ठेऊन कावळ्यांचा कावकाव थांबविण्याचा प्रयत्न करून सुट्टीचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. चीनमध्ये पक्षांची हत्या केली जात असताना आपल्याकडे मात्र पक्षांसाठी झटणाऱ्या या युवकांचे कौतुकच होत आहे.

जिल्हा परिषदेच्या वाघमोडेवाडी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करणाऱ्या प्रवीण जोशी यांनी नेहमीच आगळेवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असणारी शाळा म्हणून सर्वत्र ख्याती मिळवली आहे. अलीकडेच त्यांनी 'या चिमण्यांनो परत फिरा रे' या अनोख्या उपक्रमातून शाळेच्या आवारात पक्षांसाठी अन्न व पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना दिवस वाटून देऊन पक्षांसाठी धान्य ठेवले जाते. परिणामी या परिसरात पक्षांचा विशेषतः चिमण्यांचा किलबिलाट वाढला आहे.या सकारात्मक परिणामामुळे मात्र जोशी यांना आता पक्षी संवर्धनाचा जणू छंदच जडलाय.

शाळांच्या वार्षिक परीक्षा तोंडावर असतानाच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सगळेच ठप्प झाले. कोरोनामुळे घरी असणाऱ्या जोशी यांनी शाळेतील हा उपक्रम आपल्या मुळगाव असलेल्या गुळुंचे (ता.पुरंदर) येथेही सुरू केला आहे. लॉकडाऊनच्या काळात पक्षी वाचवा ही मोहीमच जोशी यांनी मित्रांच्या मदतीने सुरू केली आहे. त्यासाठी पशु पक्षी असणाऱ्या गुळुंचे परिसरातील रूपाडी डोंगर व त्यालगतच्या माळरानाची निवड त्यांनी केली आहे. गावचे पोलीस पाटील दीपक जाधव,नरवीर उमाजी नाईक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष संजय चव्हाण,निखिल खोमणे, राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेचे शिक्षक प्रशांत जोशी यांच्यासह काही तरुण देखील या कामात सहभागी होत आहेत. 

रोज सुमारे चार किलोमीटर अंतर पायपीट करून केवळ पक्षांसाठी या डोंगर व माळरानात ही टीम काम करत आहे. या परिसरातील झाडांना डबे बांधून त्यामध्ये धान्य व पाणी ठेवण्याची या सर्वांची धडपड सुरु आहे.लॉकडाऊनच्या काळात  पक्षांसाठी एकत्र येणारे या मित्रांनी स्वतःच्या आरोग्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यासही ते विसरले नाहीत.सोशल डिस्टन्स पाळून व तोंडाला मास्क लावूनच त्यांची पक्षांसाठी भटकंती सुरू आहे.

संचारबंदीमुळे दशक्रिया विधीसाठी मोजकेच लोक उपस्थित राहत आहेत. किंबहुना हे विधी होतच नसल्याने स्मशानभूमीत येणाऱ्या पक्षांचीही उपासमार होत आहे.ही बाब ओळखून पक्षांसाठी भाताचे गोळे करून स्मशानात ठेवण्याचे काम देखील जोशी करत आहेत.


निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी वाचवणे गरजेचे आहे.म्हणूनच पक्षांसाठी रोज अन्न व पाण्याची सोय उपलब्ध करून देत आहोत.ही मोहीम व्यापक करण्याचा आमचा मानस आहे. 
प्रवीण जोशी,मुख्याध्यापक,जि.प.शाळा वाघमोडेवाडी 

बिलीमाेरीया हायस्कूलला माेठी आग; पाचगणी,महाबळेश्वर, वाईतील अग्नीशमक दल दाखल

एसपी तेजस्वी सातपुतेंचा मुस्लीम बांधवांना संदेश

साताऱ्यात लॉकडाऊन जैसे थे: कारखानदार, बांधकम व्यावसायिकांसह मटण, चिकन, मासे विक्रेत्यांना दिलासा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT