पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा परिषद सदस्य सभेतच म्हणाले...मी बाटली आणली आहे, पिऊ का ?

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः मुदत संपूनही बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या व जावळी तालुक्‍याच्या पर्यावरणाची हानी करणाऱ्या खाणींवर कारवाई न झाल्यास सभागृहातच आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी दिल्याने वातावरण तापले. अखेरीस यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय झाल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले.
 
वार्षिक अंदाज पत्रकाबाबत झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये विविध मुद्‌द्‌यांवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जावळी तालुक्‍यात प्रशासनाला न जुमानता, कोणत्याही नियमांचे पालन न करता व मुदत संपूनही सुरू असलेल्या खाणीबाबतचा मुद्दा दीपक पवार यांनी उपस्थित केला. या प्रश्‍नाकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तो मुद्दा श्री. मानकुमरे यांनी अधिक आक्रमकपणे मांडला. अनेकदा मुद्दा उपस्थित करूनही कारवाई होत नसेल, तर मी खिशात आणलेली बाटली पिणार आहे, असा इशाराच त्यांनी दिला.

त्यामुळे सभागृहात काही काळ गंभीर वातावरण निर्माण झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून संबंधित खाण मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. ते न झाल्यास सभागृहातच उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यावर अन्य सदस्यांनीही हा मुद्दा तातडीने मार्गी लावण्याची सूचना केली. त्या वेळी अध्यक्ष उदय कबुले यांनी या प्रश्‍नासंदर्भात अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी व सदस्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुद्दा मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर सध्याचे जिल्हाधिकारी नक्की मार्ग काढतील, असे सांगत मानकुमरे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. 

हेही वाचा : Coronavirus : सातारा : त्या मुलीचाही आला रिपाेर्ट

हेही वाचा : बापरे ! विद्यार्थ्यांचा रोजच जीव धोक्‍यात; उपाययोजनांची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT