Satej Patil may be Guardian Minister of Kolhapur
Satej Patil may be Guardian Minister of Kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

... तर यांना मिळू शकते कोल्हापुरचे पालकमंत्रीपद

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  ः कोल्हापुरच्या पालकमंत्री पदावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेच कायम रहाणार असल्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसच्या वरिष्ठ सुत्रांनीच ही माहिती दिली. श्री. थोरात यांनी नकार दिल्यास गृहराज्यमंत्री सतेज पाटील किंवा सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

हे पण वाचा -  गाजलेल्या नाराजीनाट्यामुळे यांच्या पालकमंत्रीपदाला हुलकावणी


दरम्यान, श्री. थोरात यांनी आपल्याऐवजी श्री. पाटील किंवा डॉ. कदम यांची शिफारस केल्याची चर्चा होती. याबाबत श्री. थोरात यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

हे पण वाचा - राणेंवर दबाव ठेवण्यासाठी रत्नागिरीत सामंत अस्त्र

दोन दिवसांपुर्वी श्री. थोरात यांची कोल्हापुरच्या तर कोल्हापुरातील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची अहमदनगर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. श्री. थोरात यांनी यापुर्वीच पालकमंत्री पद स्विकारणार नसल्याचे सांगितले होते. मंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीमुळे पालकमंत्री पदाला वेळ देता येणार नाही अशी यामागची श्री. थोरात यांची भुमिका होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन ते तसे कळवणार होते. पण आजपर्यंत याबाबत काही घडामोडी झालेल्या नाहीत.

कॉंग्रेसकडून थोरातच
श्री. मुश्रीफ व गृहराज्यमंत्री पाटील दोघेही पालकमंत्री पदासाठी उत्सुक आहेत. मुश्रीफ हे कॅबिनेट तर पाटील राज्यमंत्री आहेत, त्यातून ज्येष्ठतेचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याने दोघांऐवजी श्री. थोरात यांना संधी दिली; पण श्री. थोरात हेच उत्सुक नसल्याने पक्षांकडून डॉ. कदम किंवा श्री. पाटील यांची शिफारस केली जाण्याची शक्‍यता होती. आता ही शक्‍यताही दिसत नसून श्री. थोरात हेच पालकमंत्री म्हणून रहातील अशी चर्चा कॉंग्रेस वर्तुळात सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umar Khalid Rejects Bail: उमर खालिद मोठा झटका! कोर्टानं पुन्हा फेटाळला जामीन अर्ज

IPL 2024: KKR च्या विजयानंतर रिंकु सिंगचा ऋषभ पंतला Video कॉल, पाहा काय झालं दोघांमध्ये संभाषण

Pune Porsche Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याच्या आरोपात अटक; कुटुंबीय म्हणतात, 'अजय तावरेंचा या प्रकरणाशी आणि ललित पाटीलशी...'

Women Health: रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्‍ये एएससीव्‍हीडीचा धोका वाढतो; जाणून घ्या तज्ञांचे मत

Malaika Arora: मलायकाच्या 'त्या' कृत्याचं होतंय कौतुक; व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT