satej patil may elected by guardian minister of kolhapur  
पश्चिम महाराष्ट्र

अखेर कोल्हापुरला मिळाले  `हे` पालकमंत्री

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापुरच्या पालकमंत्रीपदी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची वर्णी लागली आहे. सतेज पाटील यांच्या निवडीने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पालकमंत्री पदाच्या विषयावर तोडगा निघाला आहे. 

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापुरचे तर सतेज पाटील यांना भंडरा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. परंतु, थोरात यांनी कोल्हापुरचे पालकमंत्रीपद स्वीकारले नव्हते. तर मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी चढाओढ लागली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदचा पेच कायम होता. या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. सतेज पाटील यांच्या निवडीने अखेर जिल्याला पालकमंत्री मिळाले. 

पालकमंत्री पदाच्या नियुक्‍त्या जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना कोल्हापुरचे पालकमंत्री, सतेज पाटील यांना भंडारा, हसन मुश्रीफ यांना अहमदनगरची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, या निवडीनंतर दोन्ही मंत्री नाखूष होते. तर थोरात यांनी कोल्हापुरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास अनुउत्सुकता दर्शविली होती. 

थोरात यांनी नकार दिल्यानंतर पालकमंत्रीपदी विश्‍वजीत कदम यांची वर्णी लागण्याची शक्‍यता होती. परंतु, सतेज यांच्या निवडीने ती शक्‍यता फोल ठरली आहे. आता मंत्री मुश्रीफ हे अहमदगरचे पालकमंत्री आहेत. तर विश्‍वजित कदम यांच्याकडे सतेज पाटील यांच्याकडे असलेली भंडाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT