Satellite Ceremony 
पश्चिम महाराष्ट्र

याची देही, याची डोळा.. उपग्रहाचा सोहळा!

विलास कुलकर्णी

राहुरी (नगर) : श्रीहरिकोट्टा (आंध्र प्रदेश) येथील "इस्रो' केंद्रातून 27 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता "पीएसएलव्ही-सी-47' या ध्रुवीय प्रक्षेपकाच्या मदतीने 1625 किलोचा "कार्टोसॅट-3' उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. या अविस्मरणीय व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार नगर जिल्ह्यातील 80 बालवैज्ञानिक व 10 शिक्षक ठरले. या उपग्रहाबरोबर अमेरिकेचे 13 व्यावसायिक उपग्रहही अवकाशात झेपावले. तो क्षण "याची देही, याची डोळा' अनुभवताना प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. देशाभिमान व शास्त्रज्ञांच्या कामगिरीने बालवैज्ञानिक भारावून गेले. 

डॉ. सी. व्ही. रामन बालवैज्ञानिक परीक्षेतील गुणवत्ताधारक माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी नगरच्या जनसेवा प्रतिष्ठानतर्फे "इस्रो' सहलीचे आयोजन करण्यात आले होते. 26 नोव्हेंबर रोजी हे पथक मुंबईतून विमानाने चेन्नईला गेले. तेथून बसने 100 किलोमीटरवरील श्रीहरिकोट्टा येथील इस्रो केंद्रात "कार्टोसॅट-3' उपग्रहाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी पोचले. 

याबाबत "सकाळ'शी बोलताना उपक्रमप्रमुख अरुण तूपविहिरे म्हणाले, ""सतीश धवन अवकाश केंद्राच्या लॉंच पॅडवरून उपग्रहाचे प्रक्षेपण झाले. 10 हजार प्रेक्षक क्षमतेच्या गॅलरीत सर्व जण बसले. बहुतांश स्थानिक विद्यार्थी व दाक्षिणात्य नागरिक उपस्थित होते. त्यात मराठी मुले वेगळी, लक्षवेधी, उत्साही होती. समोरच्या स्क्रीनवर भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या कार्याची माहिती दाखविली जात होती. समोर एक किलोमीटरवर उपग्रह प्रक्षेपक टॉवर दिसत होते. नियंत्रण कक्षात डॉ. के. सीवन यांचे आगमन होताच प्रेक्षक गॅलरीत टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. खऱ्या हीरोचे (शास्त्रज्ञ) जोरदार स्वागत झाले.'' 

अंगावर आले शहारे 

""प्रक्षेपणाची वेळ झाली. काही सेकंदांत झाडीतून अग्नीच्या तेजस्वी गोळ्याने अवकाशात झेप घेतली. प्रचंड मोठा आवाज झाला नि क्षणार्धात यान नजरेआड झाले. डोळ्यांनी अनुभवलेला हा क्षण अंतःकरणात साठविताना प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. तिरंगा हातात घेऊन मुलांनी "वंदे मातरम', "मेरा भारत महान' या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. माध्यम प्रतिनिधींना हिंदी, इंग्रजीतून मुलाखती दिल्या. कन्नड, तेलगू, मल्याळम वाहिन्यांवर नगर जिल्ह्यातील मुले झळकली. स्थानिक वर्तमानपत्रांनी छायाचित्रे प्रसिद्ध केली,'' असे तूपविहिरे म्हणाले. 

अरविंद घोष स्मारक व संग्रहालयास भेटी

चेन्नईतील पेरियार विज्ञान केंद्र, बिर्ला तारांगण, पॉंडेचरीतील अरविंद घोष स्मारक व संग्रहालयास भेटी देऊन रविवारी (ता. 1) बालवैज्ञानिकांचे पथक जिल्ह्यात परतले. मालती जाधव, शैलेजा तूपविहिरे, भानुदास गव्हाणे, बाळासाहेब डोंगरे यांनी सहलीचे नियोजन केले. अनिल सुसे, पांडुरंग बरे, प्रवीण चाफेकर, पूजा जोशी, संगीता कस्तुरे, रोहिणी बारहाते, दीप्ती शिंदे, सपना जगताप या शिक्षकांनी सहलीत भाग घेतला.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: मोठी बातमी! २६ वर्षात पहिल्यांदाच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार

Vasai Virar Election : वसई-विरार महापालिका निवडणूक; उमेदवारांच्या मालमत्तेचे रहस्य जाहीर; अब्जाधीशांचा समावेश!

BMC Election: महायुती मैदानात, पण ठाकरे बंधू...! जाहीरनामा झाला, प्रचार कुठे? प्रचारात उशीर ठाकरेंना महागात पडणार का?

Junnar Crime : जुन्नरच्या निमगिरीत जमिनीच्या वादाचा रक्तरंजित शेवट; फरार आरोपी २४ तासांत पुण्यातून अटकेत!

MCA CET Registration : २०२६-२७ साठी एमसीए व एम.एचएमसीटी सीईटी अर्ज सुरू!

SCROLL FOR NEXT